Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तीन वाजता तातडीची मंत्रिमंडळ बैठक…लॉकडाऊन की कडक निर्बंध?  

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cabinet on corona

मुक्तपीठ टीम

शनिवारी एका दिवसात एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दहा हजाराकडे, महामुंबई परिसरात सोळा हजाराकडे तर राज्यात पन्नास हजाराकडे झेपावली आहे. वारंवार नागरिकांना आवाहन करुनही कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होताना दिसत नाही. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज सकाळी आठपासून मुंबईतील बाजारांचा दौरा केला, तेव्हा त्यांनाही निष्काळजी गर्दी दिसली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचेही अनुभव तेच आहेत. त्यामुळे आज तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलवलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन की कडक निर्बंध यावर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेले दोन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांशी कोरोना सुरक्षा उपाययोजनेसंदर्भात चर्चा केली. नेमके काय करावे, याबद्दल त्यांची मते जाणून घेतली. आज सकाळीही त्यांनी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील व्यावसायिकांशी चर्चा केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सवर आहे. नेहमी बुधवारी असणारी बैठक रविवारी तातडीने बोलवल्याने मोठा निर्णय होण्याची चर्चा आहे.

  • त्या त्या जिल्ह्यांमधील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर उपाययोजना करायच्या की संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घ्यायचा ते ठरू शकते.
  • मुंबई मनपासह महामुंबई परिसरासाठी पुण्याप्रमाणे मर्यादित लॉकडाऊनबद्दलही निर्णयाची शक्यता आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक

  • मुंबईत शनिवारी कोरोनाचे ९०९० रुग्ण सापडले आहेत.
  • मुंबईत सद्यस्थितीत ६२ हजार १८७ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.
  • मुंबईतील रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी कमी होऊन ४४ दिवसांवर आला आहे.
  • गोरेगाव विभागात हेच प्रमाण ३३ दिवस झाले आहे.
  • वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे ३७ दिवस, चेंबूर – गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे ३८ दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

 

महाराष्ट्रातही भयावह संसर्ग

  • शनिवारी राज्यात ४९,४४७ नवीन रुग्णांचे निदान.
  • शनिवारी ३७,८२१ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात शनिवारपर्यंत एकूण २४,९५,३१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.४९% एवढे झाले आहे.
  • राज्यात शनिवारी २७७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे.
  • शनिवारपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 


Tags: cm uddhav thackeraycoronaMaharashtramaharashtra cabinet meetingकोरोनामंत्रिमंडळ बैठकमहाराष्ट्रमुक्तपीठमुंबई
Previous Post

महाराष्ट्रात लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम, एका दिवसात ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण!

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
top 10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!