Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लखीमपूर शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्र बंदसाठी आघाडीची तयारी, भाजपाचा टोला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mva up

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात महाराष्ट्रातील आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निषेध ठराव केल्यानंतर आता भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकासआघाडीने अकरा ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत बंदची घोषणा केली. आता आघाडीच्या पक्षांनी महाराष्ट्रात बंद कडकडीत पाळला जावा, यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला टोला मारला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत उत्तरप्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का? असा प्रश्न फडणवीसांनी आघाडीच्या सरकारला विचारला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

  • भाजपा भारतातील शेतकऱ्यांप्रती क्रुरतेने वागत आहे.
  • भाजपा आणि त्यांची सत्ता असलेली राज्यं देशातील विविध भागात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन चिरडण्याचं काम करत आहे.
  • याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे.
  • म्हणून या झालेल्या घटनेचा निषेध करणं, आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.
  • उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला बेमुर्वतखोरपणे मोकळं सोडतंय.
  • त्याचाही निषेध आवश्यक आहे.
  • म्हणून ११ ऑक्टोबरला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आघाडीतील मित्रपक्षांच्या वतीने हा बंद पुकारत आहोत.

 

असा असणार महाराष्ट्र बंद

  • जयंत पाटील यांनी यावेळी बंदचं स्वरुपही स्पष्ट केलं.
  • या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील.
  • यात रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल.
  • आघाडीच्या वतीने हा निर्णय हा घोषित करण्यात येतो आहे.
  • हा बंद सरकार म्हणून नसेल.
  • मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने या बंदची घोषणा करत आहोत.
  • पक्षांच्या वतीने हा बंद पुकारण्यात येतो आहे.

 

त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी बोलावं- फडणवीस

  • कॅबिनेट बैठकीत लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक.
  • पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का?
  • त्यांचे कैवारी ते झाले नाहीत.
  • अद्याप मदतीचा निर्णय घेतला नाही.
  • दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप आंदोलन करेल.
  • उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार काम करेल.
  • इथे शेतकरी मरत आहेत.
  • त्यावर हे काही बोलत नाही, अशी टीका फडणवीसांनी केलीय.

Tags: devendra fadanvisEknath Shindejayant patillakhimpurMVAUattar Pradeshआघाडी सरकारउत्तर प्रदेशएकनाथ शिंदेजंयत पाटीलदेवेंद्र फडणवीसबाळासाहेब थोरातलखीमपूर
Previous Post

“आमदारांनी स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा”: अनिल परब

Next Post

“ठाण्यात नवरात्रीनिमित्त महारक्तदान सप्ताह”, एकनाथ शिंदे यांची संकल्पना

Next Post
eknath shinde

"ठाण्यात नवरात्रीनिमित्त महारक्तदान सप्ताह", एकनाथ शिंदे यांची संकल्पना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!