मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात महाराष्ट्रातील आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निषेध ठराव केल्यानंतर आता भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकासआघाडीने अकरा ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत बंदची घोषणा केली. आता आघाडीच्या पक्षांनी महाराष्ट्रात बंद कडकडीत पाळला जावा, यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला टोला मारला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत उत्तरप्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का? असा प्रश्न फडणवीसांनी आघाडीच्या सरकारला विचारला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
- भाजपा भारतातील शेतकऱ्यांप्रती क्रुरतेने वागत आहे.
- भाजपा आणि त्यांची सत्ता असलेली राज्यं देशातील विविध भागात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन चिरडण्याचं काम करत आहे.
- याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे.
- म्हणून या झालेल्या घटनेचा निषेध करणं, आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.
- उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला बेमुर्वतखोरपणे मोकळं सोडतंय.
- त्याचाही निषेध आवश्यक आहे.
- म्हणून ११ ऑक्टोबरला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आघाडीतील मित्रपक्षांच्या वतीने हा बंद पुकारत आहोत.
असा असणार महाराष्ट्र बंद
- जयंत पाटील यांनी यावेळी बंदचं स्वरुपही स्पष्ट केलं.
- या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील.
- यात रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल.
- आघाडीच्या वतीने हा निर्णय हा घोषित करण्यात येतो आहे.
- हा बंद सरकार म्हणून नसेल.
- मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने या बंदची घोषणा करत आहोत.
- पक्षांच्या वतीने हा बंद पुकारण्यात येतो आहे.
त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी बोलावं- फडणवीस
- कॅबिनेट बैठकीत लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक.
- पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का?
- त्यांचे कैवारी ते झाले नाहीत.
- अद्याप मदतीचा निर्णय घेतला नाही.
- दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप आंदोलन करेल.
- उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार काम करेल.
- इथे शेतकरी मरत आहेत.
- त्यावर हे काही बोलत नाही, अशी टीका फडणवीसांनी केलीय.