मुक्तपीठ टीम
बनावट पासपोर्टवर परदेशात प्रवास करणाऱ्या बांगलादेशी नागरिक इर्शाद शहाबुद्दीन शेखला महाराष्ट्र एटीएसने दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. शेख शारजा येथे गेला होता आणि दिल्ली विमानतळावर परतल्यावर त्याला अटक करण्यात आली. दिल्लीचे पोलीस मुंबईत, महाराष्ट्रात कारवाई करत असतानाच आता मुंबई पोलिसांची दिल्लीतील कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.
०८ ऑक्टोबरपर्यंत इर्शादला एटीएसच्या कोठडीत ठेवले जाईल
- इर्शाद शेखला अटक केल्यानंतर, एटीएस अधिकाऱ्यांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले
- इर्शाद ला ०८ ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- एटीएसने स्पष्ट केले की, इर्शाद मूळचा बांगलादेशातील आहे.
- इर्शादला पकडण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची एक टीम मुंबईहून नवी दिल्लीला पोहोचली होती.
- थोड्यावेळा पुर्वीच इर्शादला मुंबईत आणण्यात आले आहे.
- सध्या एटीएसची टीम त्याची कसून चौकशी करत आहे.
महाराष्ट्र एटीएसने तीन संशयितांना केली होती अटक
- महाराष्ट्र एटीएसने १५ दिवसांत मुंबईतून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.
- एटीएसने प्रथम झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली, ज्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात आली.
- यानंतर इरफान शेख संशयिताला शुक्रवारी मुंबईतून अटक करण्यात आली.
- या सर्वांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने कथित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.