मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर दीर्घकाळ रिकामं राहिलेलं विधानसभा अध्यक्षपद भरण्याचा निर्णय आता जाहीर झाली आहे. येत्या २७ डिसेंबरला या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर २८ डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान होईल. हे मतदान आवाजी मतदानाने होणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम ठरला…
- शुक्रवारी सकाळी कामगाज सल्लागार समितीची बैठक झाली.
- या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला.
- येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे.
- या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे.
- त्यामुळे प्रत्यक्ष मतदाना ऐवजी आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार आहे.
- अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने काही मतांची फिरवाफिरव केल्यास वेगळी चर्चा रंगू नये यासाठी आघाडीने काळजी घेतल्याचे दिसते.
- भाजपाने आक्रमकपणा वाढवल्याने कोणताही धोका पत्करण्यास आघाडीचे नेते तयार नाहीत.
- भाजपाने गुप्त मतदानासाठी आग्रह धरल्याने आघाडीचा संशय अधिकच वाढला होता.
- त्यामुळेच नियमावलीत बदल केला असल्याचं सांगितलं जातं.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची नावे?
- आघाडीतील सत्तावाटपात विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे.
सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे चर्चेत आहेत. - भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे चर्चेत आहेत.
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचे कळते.