मुक्तपीठ टीम
आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा पाच दिवसांचा असून २८ डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे. यावेळी हिवाळी अधिवेशन हे मुंबईत होत आहे. या अधिवेशनात सभागृहात आणि सभागृहाबाहेर जे घडेल त्यातील महत्वाच्या घडामोडी मांडल्या जातील.
विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यावेळी शिवरायांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले. भाजपा आमदारांनीही शिवरायांना अभिवादन केले. कर्नाटकात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या अभिवादनाला वेगळे महत्व होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले, पण तरीही त्यावर सभागृहाबाहेर भाजपाचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी पदाचा चार्ज दुसऱ्यांकडे द्या, अशी टोलेबाजी केली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून भाजपाची घोषणाबाजी, पेपरफुटी, शेतकऱ्यांचे वीज बिल, आरोग्य विभाग भरती, म्हाडा भरती यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. व
या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही- देवेंद्र फडणवीस
- अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत.
- न्यासा कंपनीला २१ जानेवारी २०२१ ला अपात्र ठरवलं गेलं.
- त्यानंतर ४ मार्च २०२१ ला हायकोर्टाच्या निर्णयानं पात्र केलं.
- मात्र, चार कंपन्या डावलून न्यासाला काम दिलं.
- त्यानंतर आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाला.
- म्हाडा भरतीत घोटाळा झाला.
- टीईटी मध्ये घोटाळा झाला.
- या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही.
- हे सगळे घोटाळे या ठिकाणी चालले आहेत.
- २५ आणि २६ सप्टेंबरला परीक्षा घेतली.
- न्यासानं या परीक्षेत पेपर फोडण्यापासून सर्व गोष्टी फोडण्यापर्यंत सर्व काम केली आहेत.
हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते: सुधीर मुनगंटीवार
- वीज बिलाची सूट यांनी काढली, कृषी पंपाच्या बाबत देखील चुकीचा निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांचं खासकरून
- मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्यया होतो आहे.
- हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते
- हजारो वर्षांपासून चार्ज दुसऱ्याकडे देण्याची पद्धत आहे आता यांनी ठरवलं आहे मीच ठरवेल ते धोरण आणि मीचं बांधेन तोरण असं सुरू आहे
- त्यांनी तत्काळ अजित पवार, आदित्य ठाकरे असोत यांना तत्काळ चार्ज द्यावा आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा
सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा नियम बदलण्यावरील चर्चेत मतदारांशी बेईमानी हा शब्द वापरला, त्यावर नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. नानाभाऊ दहावर्ष भाजमध्ये राहिले, आम्ही संस्कार दिले त्याचा वापर तर करा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करतायत- राजेश टोपे
- कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं.
- या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे.
- गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं.
- कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय.
- ते दुरुस्त करणार आहे.
- जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही.
- जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही.
- जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही.
- गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत.
- गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे.
- गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत.
- पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ.
अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी- पृथ्वीराज चव्हाण
- आज सभागृहात अध्यक्ष निवडीत बदल सुचवलेले आहेत
- खुल्या मतदानाने निवड प्रक्रिया व्हावी असा प्रस्ताव नियम समितीने पारित केला आहे
- त्याचा अहवाल मांडण्यात आला
- विधिमंडळाचे अधिवेशन पाच दिवसाचे असल्याने एक दिवसात निर्णय द्यावा असे ठरले
- उद्या त्यावर निर्णय होईल
- अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी
- परीक्षा घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
…पण अत्यंत तकलादू उत्तर देण्यात आले- प्रविण दरेकर
- आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत सरकारला विचारणा केली पण अत्यंत तकलादू उत्तर देण्यात आले
- न्यासा कंपनीचे समर्थन करणारे उत्तर देण्यात आले
- न्यासा ब्लॅक लिस्ट असताना तिला पात्र करून काम दिले गेले
- अनेक अधिकारी दलालाना अटक केली तरी सरकार म्हणतेय आम्हाला माहिती द्या
- उत्तर द्यायचे नसेल तर तुम्ही त्या दलालांना पाठीशी घालण्याचे काम करत आहात
- हा जो घोटाळा झाला त्यात अनेक लोकांचा सहभाग आहे
- त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यत पोहोचले आहे.
भास्कर जाधव यांना निलंबित करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी
- नितीन राऊत यांनी १५ लाखांचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.
- फडणवीस यांनी राऊत यांनी माफी मागावी, असं म्हटलं. तर, यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले.
- त्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी या वादात उडी घेतली.
- त्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले.
- भास्कर जाधव यांना सस्पेंड करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस हक्कभंग आणणार असतील तर मी तयार आहे- भास्कर जाधव
- भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागत, देवेंद्र फडणवीस यांचं हक्कभगांचं चॅलेंज स्वीकारलं आहे.
- त्यावेळेले माननीय विरोधी पक्षनेते जे बोललो ते मी बोललो आणि अंगविक्षेप केला, माझ्या बोलण्याच्या वेळी नकळत हातवारे होतात.
- मी नक्कल केली मात्र, असंसदीय शब्द उच्चारलेले नाहीत. सुधीर मुनगंटीवार विलास काका उंडाळकर यांच्याबद्दल काय बोलले होते.
- त्यांनी माफी मागितली होती.
- अध्यक्ष महोदय तुमच्या सूचनेनुसार मी बिनशर्त माफी मागत आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.
- तर, देवेंद्र फडणवीस हक्कभंग आणणार असतील तर मी तयार आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
पेपरफुटी प्रकरणात मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश, आमदार प्रसाद लाड यांचा आरोप
आम्ही यासंदर्भातील पुरावे पटलावर ठेऊ. यामध्ये गृहनिर्माण मंत्री, शिक्षण मंत्री, यांची चौकशी झाली पाहीजे. पेपरफुटी प्रकरणात आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. जर यांनी सीबीआय चौकशी मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन मागणी करू. सरकार पोलिस चौकशी करतयं मात्र त्यांच्यावर मंत्र्यांचा दबाव आहे.
शक्ती विधेयक मंजूर होईल ही अपेक्षा – नीलम गोऱ्हे
शक्ती विधेयकाकरता चिकीत्सा समितीचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. आरोपींना लवकर शिक्षा होऊन, महिलंचं मदत पुर्नवसन लवकर व्हावं याकरता हे विधेयक महत्वाचं आहे. या विधेयकावर अधिवेशनात चर्चा होऊन लवकर मंजूर होईल अशी अपेक्षा असल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.