Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला प्रतिष्ठेचा विंग्ज इंडिया पुरस्कार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Maharashtra Airport Development Company

मुक्तपीठ टीम

नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार (एमओसीए) आणि फिक्कीद्वारे आयोजित विंग्स इंडिया २०२२ इव्हेंट आणि अवार्डस् समारंभात महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनीला (एमएडीसी) अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट नागरी उड्डयन पद्धती, नवीनतम कल आणि नवकल्पना प्रदर्शित करणे आणि आदान – प्रदान करणे या उद्देशाने दिनांक २४ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत बेगमपेट विमानतळ, हैदराबाद येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) ने विंग्स इंडिया २०२२ इव्हेंट आणि विंग्स इंडिया अवॉर्ड्समध्ये “भागीदार राज्य” (पार्टनर स्टेट) म्हणून महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले. एमएडीसीने महोत्सवाच्या ठिकाणी अतिशय प्रशस्त, नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विमान वाहतूक क्षेत्रातील ठळक वैशिष्ट्ये, एमएडीसी, मिहान प्रकल्प, मिहानमधील प्रमुख विमान वाहतूक प्रकल्प आणि मिहानमधील कंपन्यांची माहिती प्रदर्शित करत विमान वाहतूक क्षेत्रातील राज्याच्या लक्षणीय कामगिरीचे प्रदर्शन केले. मान्यवर आणि व्यावसायिक ग्राहकांना हाताळण्यासाठी आणि बिझनेस टू बिझनेस मीटिंग आयोजित करण्यासाठी एअरसाइडवर आणखी एक सुंदर दालन उभारण्यात आले होते.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते, प्रामुख्याने शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड यांना “बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर” या श्रेणीतील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी या पुरस्काराबद्दल एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले असून एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Tags: Civil Aviation Minister Jyotiraditya ScindiaMaharashtraMaharashtra Airport Development CompanyWing India Awardsमंत्री ज्योतिरादित्य सिंदीयामहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीविंग्ज इंडिया पुरस्कार
Previous Post

गुरुदक्षिणा! माजी विद्यार्थ्यांची आयआयटीला १०० कोटी रुपयांची देणगी!!

Next Post

इम्रान खान सामन्याआधीच टीमसह मैदान सोडून गेले! शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान होणार!

Next Post
Imran Khan

इम्रान खान सामन्याआधीच टीमसह मैदान सोडून गेले! शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!