Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील ७० ढोल-ताशा पथकांचे अभिनव वाद्य पूजन व डॉ. प्रभा अत्रेंची ग्रंथतुला

September 2, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Prabha Atre 2

मुक्तपीठ टीम

वंदेमातरम संघटना कृत युवा वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि शिववर्धन वाद्य पथक यांच्या वतीने महाराष्ट्रातील ७० ढोल-ताशा पथकांचे अभिनव वाद्य पूजन सोहळा व डॉ. प्रभा अत्रे यांची संगीत सेवेबद्दल कृतज्ञता ग्रंथतुला करण्यात आली. ग्रंथतुलेतील पुस्तके कारगिल मधील हुंदरमन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या ग्रंथालयाला दिली जाणार आहेत.

Prabha Atre 2

“आपल्याला जी गोष्ट आवडते, ती मनापासून आणि प्रामाणिकपणाने केली, तर त्यात आपण यशस्वी होतो. कामातील स्पष्टता, सातत्य, नाविन्यता प्रगल्भतेकडे घेऊन जाते. त्यामुळे जे जे आवडते ते ते पारखून घेऊन त्यात उत्कृष्ट देण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे,” अशी भावना प्रख्यात गायिका, स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी प्रसाद भारदे यांनी डॉ. प्रभा अत्रे यांची मुलाखत घेतली. शास्त्रीय संगीत, त्यातील विविध राग, हरकती, बंदिशी, कायदे, घराणे याविषयी प्रभाताईंनी मनमोकळा संवाद साधला. बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत रंगलेल्या या सोहळ्याप्रसंगी डॉ. सतीश देसाई, दीपक मानकर, प्रसाद भडसावळे, वंदेमातरम संघटनेचे वैभव वाघ, सचिन जामगे, ॲड. अनिश पाडेकर, अक्षय बलकवडे, शिरीष मोहिते, अमित रानडे यांच्यासह विविध पथकांचे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, “श्रोत्यांची दाद कलाकारांना वाढवते. श्रोता असेल तर कलाकार मोठा होतो. माझे गाणे शेवटपर्यंत राहावे, हीच माझी इच्छा आहे. आज इथे एवढी तरुण मंडळी पाहून मलाही तरुण झाल्यासारखे वाटते. या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची गोडी लावण्यासाठी त्याकडे कला म्हणून पाहायला हवे. आज संगीत साधनेऐवजी मनोरंजनाकडे अधिक झुकले आहे. आपल्या गायनात स्पष्टता, रियाज आणि सखोल अभ्यास हवा. रात्रीच्या वेळी मुलांना शास्त्रीय संगीत, संस्कार ऐकायला लावले पाहिजे.”

पाहा:


Tags: Dhol-Tasha TeamDr. Prabha Atre Grantatulagood newsInnovative Instrumental WorshipMaharashtramuktpeethअभिनव वाद्य पूजनचांगली बातमीडॉ. प्रभा अत्रे ग्रंथतुलाढोल-ताशा पथकमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

विदेशी पर्यटकांना जीएसटी परत मिळणार, लोकल शॉपिंग वाढवण्यासाठी योजना

Next Post

ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सच्या स्पर्धेत ‘पीव्हीजी’ला देशात तिसरे, महाराष्ट्रात पहिले पारितोषिक

Next Post
Automotive Engineers Competition

ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सच्या स्पर्धेत 'पीव्हीजी'ला देशात तिसरे, महाराष्ट्रात पहिले पारितोषिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!