मुक्तपीठ टीम
आज राज्यात ४,४५६ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर दिवसभरात ४,४३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागांमधील रुग्णसंख्या घटती असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे अद्यापि चिंता वाढवत आहेत. त्यात आता मुंबईची भर पडली आहे. आता मुंबईतील नव्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी मुंबईच ४१५ नवे रुग्ण आढळले. ३२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असले तरी मुंबईतील सील केलेल्या इमारतींची संख्याही वाढून आता ३२ झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर १,४७९ दिवसांवर आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती आकड्यांमध्ये
- आज राज्यात ४,४५६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,४३० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७७,२३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १८३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४१,५४,८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६९,३३२ (११.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,९०,४२७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,०७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५१,०७८ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,३६५
- महामुंबई ०, ८७६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७८३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१८७
- कोकण ०,१९८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०४७
एकूण नवे रुग्ण ४ हजार ४५६ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,४५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,६९,३३२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ४१५
- ठाणे ३९
- ठाणे मनपा ८०
- नवी मुंबई मनपा ५४
- कल्याण डोंबवली मनपा ५६
- उल्हासनगर मनपा १७
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३९
- पालघर ११
- वसईविरार मनपा ३६
- रायगड ६२
- पनवेल मनपा ६६
- ठाणे मंडळ एकूण ८७६
- नाशिक ४१
- नाशिक मनपा ६०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६५३
- अहमदनगर मनपा २३
- धुळे ०
- धुळे मनपा १
- जळगाव ३
- जळगाव मनपा १
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ७८३
- पुणे ६०८
- पुणे मनपा ३२४
- पिंपरी चिंचवड मनपा १६७
- सोलापूर ३६७
- सोलापूर मनपा ४
- सातारा ५४८
- पुणे मंडळ एकूण २०१८
- कोल्हापूर ६४
- कोल्हापूर मनपा ३३
- सांगली २१२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३८
- सिंधुदुर्ग ७३
- रत्नागिरी १२५
- कोल्हापूर मंडळ एकूण ५४५
- औरंगाबाद ११
- औरंगाबाद मनपा १६
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ४
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ३३
- लातूर १५
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद ५८
- बीड ७९
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १५४
- अकोला १
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ७
- बुलढाणा १०
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण २२
- नागपूर १
- नागपूर मनपा ५
- वर्धा १
- भंडारा २
- गोंदिया १
- चंद्रपूर ७
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ६
- नागपूर एकूण २५
एकूण ४ हजार ४५६
टीप– ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.