Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

September 1, 2021
in सरकारी बातम्या
0
mpcb

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे, सहाय्यक सचिव (तांत्रिक) पुंडलिक मिराशे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, मागील एक ते दीड वर्ष आपण कोरोनाचा सामना करत असतानाही माझी वसुंधरा अभियान, कांदळवनांचे संरक्षण, जंगलांची वाढ यासाठी काम करत आहोत. महाराष्ट्र हा पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत जगाला मार्ग दाखवू शकतो. यामध्ये सोशल मीडिया हे महत्वाचे (साधन) आहे. समाजमाध्यमे ही वर्तमानातील आरसा असून आपल्या कामाचे प्रतिबिंब त्यात दिसून येत असते. म्हणून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकसंवाद साधणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

 

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, जगभरात कोणतीही घडलेली घटना क्षणभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. म्हणून डिजिटल सोशल मीडिया खूप महत्वाचे माध्यम झाले आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ सोशल मीडियावर आल्याने पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणविषयक माहिती आणि जनजागृतीसाठी त्याचा व्यापक उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ट्विटर हॅन्डल आणि Instagram हे @mpcb_official तर फेसबूक MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD या नावाने कार्यरत झाले आहे.


Tags: @mpcb_officialAaditya ThackerayMaharashtraMAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARDsanjay bansodeपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमहाराष्ट्रमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसंजय बनसोडे
Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?

Next Post

राज्यात नवे रुग्ण ४ हजार ४५६, मुंबईत पुन्हा वाढ, ४१५ नवे रुग्ण!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात नवे रुग्ण ४ हजार ४५६, मुंबईत पुन्हा वाढ, ४१५ नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!