Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटी कंपन्यांची लवकरच महाभरती! ३ लाख ६० हजार जागांवर आयटी व्यावसायिकांना संधी!

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
IT Companies

मुक्तपीठ टीम

आयटी प्रोफेशनल्ससाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आयटी क्षेत्रात ३ लाख ६० हजार जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत. कोरोना संकट काळात इतर उद्योगांवर संकट कोसळलं, पण त्याचवेळी आयटी कंपन्यांची मागणी मात्र वाढली. त्यामुळे स्वाभाविकच आयटी कंपन्यांची उलाढालही वाढली. त्यातूनच फायदाही. कोरोनानंतरच्या परिस्थितीतही आयटी कंपन्यांच्या सेवांमध्ये वाढच होत आहे. त्यामुळे आता या कंपन्या नव्याने भरती करत आहे.

 

भारतीय आयटी मार्केटमध्ये वाढ होणार

  • भारतीय आयटी सेवा बाजार २३० अब्ज डॉलर ते २४० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जे प्रामुख्याने मुख्य १५ ते २० भारतीय आयटी कंपन्यांच्या वाढीमुळे चालते.
  • नॅसकॉमच्या ताज्या अहवालात असेही म्हटले आहे की, पुढील आर्थिक वर्ष देखील आयटी क्षेत्रासाठी उत्कृष्ट असेल.
  • पुढील वर्षीही डिजिटल मागणी कायम राहील, त्यामुळे हे क्षेत्र वेगाने वाढेल. या उद्योगाचा आकार २०२६ पर्यंत ३५० अब्ज डॉलर होईल.

 

महसुलात मोठी वाढ होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही आयटी क्षेत्राला वेग आहे. म्हणजेच या क्षेत्रावर महामारीचा विशेष प्रभाव नाही. अहवालानुसार, या वर्षी महसुलातही मोठी झेप होईल आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करतील. चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रासाठी महसूल वाढ १९ ते २१ टक्‍क्‍यांच्या श्रेणीत असेल, जी त्याच्या इतिहासातील सर्वोच्च असेल. आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत ही वाढ कायम राहील, असे त्यात म्हटले आहे.

 

सहा कंपन्यांमध्ये सर्वाधिक भरती

  • नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की मुख्य सहा आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीत २.१५ लाख पदवीधरांना फ्रेशर्स म्हणून नियुक्त केले आहे.
  • गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता, हा आकडा ९९ हजारपेक्षा थोडा जास्त होता.
  • अहवालानुसार, कॉग्निझंट, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा मिळून येत्या वर्षासाठी १.४ लाख फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची तयारी करत आहेत.

 

सध्या नोकरी सोडून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे

  • अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात नोकरी सोडण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
  • आयटी क्षेत्रात नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान २२ टक्के होते, जे दुसऱ्या तिमाहीत म्णजेच जुलै ते सप्टेंबरमध्ये १९.५ टक्के होते.
  • अहवालात असा अंदाज आहे की, चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्चमध्ये हा दर २२ ते २४ टक्क्यांच्या दरम्यान राहील. ही चिंतेची बाब आहे की आयटी क्षेत्रातील पगार सतत वाढत आहेत, तर अॅट्रिशन रेट कमी होत नाहीये.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Careersemployment opportunitiesgood newsIndian IT Services Marketit companiesit professionalsjob opportunitiesMahabharatimuktpeethआयटी कंपन्याआयटी व्यावसायिककरिअरचांगली बातमीनोकरीची संधीभारतीय आयटी सेवा बाजारमहाभरतीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

राज्यात १ हजार ४३७ नवे रुग्ण, ३ हजार ३७५ रुग्ण बरे!

Next Post

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाच्या दर्जासाठीचा प्रस्ताव राज्याकडून केंद्र शासनाकडे

Next Post
Thane Bay area

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाच्या दर्जासाठीचा प्रस्ताव राज्याकडून केंद्र शासनाकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!