मुक्तपीठ टीम
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ओएनजीसीत नॉन-एक्झिक्युटिव्ह या पदावर एकूण ९२२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १०वी उत्तीर्ण/ ऑटो/ मेकॅनिकल/ पेट्रोलियम/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/ ई अॅंड सी/ इंस्ट्रुमेंटेशन/ पेट्रोलियम/ मटेरियल मॅनेजमेंट इंजिनीअरिंग डिप्लोमा/ बी.एससी/ पदवीधर/ एम.एससी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com ला भेट द्या.
- होमपेजवर, करिअर टॅबवर क्लिक करा.
- पुढे, ऍप्लिकेशन लिंक शोधा.
- अर्ज भरा.
- अर्ज फी भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
- भविष्यात संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com वरून माहिती मिळवू शकता.