Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाबळेश्वरमध्ये हिरवा आणि लाल भात, वजनही कमी करणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Green & Red Rice

मुक्तपीठ टीम

भातही खा…मनमुराद खा आणि वजनही घटवा. पुन्हा तुमची भूक जरा जास्तच वाढवण्यासाठी या भाताला रंगही असणार. नाही बिर्याणीत देतात तसा कृत्रिम नाही तर भाताचाच स्वत:चा नैसर्गिक असा. महाराष्ट्रात लाल आणि हिरव्या भाताची लागवड महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे. तेथे यापूर्वी निळा भात व केशराचा अभिनव उपक्रम महाबळेश्वरमध्ये करण्यात आला होता त्याला कृषी विभागाला यश देखील प्राप्त झाले होते. आता महाबळेश्वर कृषी विभागाने लाल आणि हिरव्या भाताची लागवड नुकतीच केली आहे.

 

Green & Red Rice (3)

 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील बिरवाडीमध्ये कृषि विभागामार्फत पौष्टिक अशा हिरव्या व लाल भाताची लागवड करण्यात आली आहे. बिरवाडी येथील शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतात एस.आर.टी म्हणजेच सगुणा भात तंत्रज्ञान या पद्धतीने गादी वाफ्यावर करण्यात आली आहे.

 

Green & Red Rice (2)
भात हे अनेकांचे मुख्य अन्न आहे. भात म्हटले की फक्त पांढरा रंग आठवतो. परंतु मागील आठवड्यातच महाबळेश्वर तालुक्यात निळ्या भाताची लागवड करण्यात आली होती. याचबरोबर आता हिरवा व लाल भाताचीही लागवड करण्यात आली आहे. ही लागवड करीत असताना शेतकरी वर्गाला कृषि विभागाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सातारा कृषी उपसंचालक विजय राऊत, वाई उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, सातारा तंत्र अधिकारी महामुलकर, कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे, मंडळ कृषी अधिकारी बुधावले, कृषी सहाय्यक दिपक बोर्डे, विशाल सुर्यवंशी, शेतकरी समीर चव्हाण उपस्थित होते.

 

Green & Red Rice (1)

हिरव्या भाताची वैशिष्ट्ये

  • भातामध्ये ९६ टक्के फायबर,फॅट फ्री भात तसेच
  • ॲंटीऑक्सीडेंटस, न्युट्रीयन्टस व व्हीटामिन्स विपूल प्रमाणात आढळतात.

 

Green & Red Rice (6)

लाल भाताची वैशिष्ट्ये

  • या भातामध्ये फायबर,आर्यन ,मॅंगेनीजचे प्रमाण जास्त आहे.
  • मुबलक प्रमाणातील आर्यन व व्हीटॅमिन्स मुळे रक्तातील लाल पेशींची संख्खा वाढण्यास मदत होते.
  • या भातामध्ये ब्राऊन भातापेक्षा १० पट जास्त ॲंटीऑक्सिटेंडचे प्रमाण आहे.
  • ११० दिवसाचे लाल भाताचे वाण असून यामध्ये ॲन्योसायनीनचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
  • त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो

 

Green & Red Rice (4)

हिरव्या भाताची वैशिष्ट्ये

  • ग्रीन राईसबद्दल कृषि सहाय्यक दीपक बोर्डे यांनी माहिती दिली.
  • महाराष्ट्रामध्ये प्रथमच हिरव्या भाताची लागवड होत आहे.
  • ‘तिलकस्तुरी’ हे हिरव्या भाताचे वाण असुन ते १४० दिवसांमध्ये तयार होते.
  • या भात पिकाची वाढ १२५ सेंमी पर्यंत होते.
  • वनस्पतींच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्य मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो.
  • हेच पानांमध्ये असणारे हरितद्रव्य भातांच्या दाण्यांमध्ये आढळते.
  • त्यामुळे भाताचे दाणे हिरवे दिसतात.
  • त्यामुळे याला हिरवा भात किंवा ग्रीन राईस म्हटले जाते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Green RiceMahabaleshwarRed RiceS.R.Tएस.आर.टीबिरवाडीमहाबळेश्वरलाल भातसगुणा भात तंत्रज्ञानसमीर चव्हाणहिरव्या भात
Previous Post

ठाण्यात कर्करोग रुग्णालयास राज्य सरकारची मंजुरी

Next Post

अब तक डझन! काश्मिरी तरुणी बारावी भारतीय लढाऊ वैमानिक!

Next Post
mawya sudan

अब तक डझन! काश्मिरी तरुणी बारावी भारतीय लढाऊ वैमानिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!