Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हक्काचा निवारा सर्वांना! ‘महा आवास अभियान २०२०-२१’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागात गोंदिया, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत अहमदनगर जिल्हा अव्वल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Maha Awas

मुक्तपीठ टीम

महा आवास अभियान २०२०-२१ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हाप व्दितीय क्रमांक आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हे ठरले आहेत. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान २०२०-२१ चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान– २०२०-२१ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात ५ लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाना, १० अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

  • सर्वोत्कृष्ट विभाग : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- कोकण – प्रथम, नागपूर – द्वितीय, नाशिक – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- कोकण – प्रथम, नाशिक – द्वितीय, पुणे – तृतीय.
  • सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, धुळे – द्वितीय, ठाणे – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, रत्नागिरी – द्वितीय, वर्धा – तृतीय.
  • सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोरेगाव (जि.गोंदिया) – प्रथम, गगनबावडा (जि.कोल्हापूर) – व्दितीय, अकोले (जि.अहमदनगर)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- सडक अर्जुनी (जि.गोंदिया) – प्रथम, मुक्ताईनगर (जि.जळगाव)- व्दितीय, कागल (जि.कोल्हापूर) – तृतीय.
  • सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- नाव (जि.सातारा) – प्रथम, वाडोस (जि.सिंधुदुर्ग) – व्दितीय, तडेगाव (जि.गोंदिया) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अंबावडे (जि.पुणे) – प्रथम, अणाव (जि.सिंधुदुर्ग) – व्दितीय, बोरगाव (जि.चंद्रपूर)– तृतीय.
  • सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- करंजेपुल (जि.पुणे) – प्रथम, देर्डे कोऱ्हाळे (जि.अहमदनगर) – द्वितीय, निंभी खुर्द (जि.अकोला) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- चिंचवली (जि.ठाणे)– प्रथम, शिरवली (जि.पुणे)- द्वितीय, अंदूरा (जि.अकोला) – तृतीय.
  • सर्वोत्कृष्ट गृहसंकुले : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- लोणी (जि.अहमदनगर)– प्रथम, येडोळा (जि.उस्मानाबाद) – द्वितीय, कणकापूर (जि.नाशिक)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- खारेकर्दुणे (जि.अहमदनगर)– प्रथम, अदासी (जि.गोंदिया)- द्वितीय, मुणगे (जि.सिंधुदुर्ग) – तृतीय.

या व्यतिरीक्त, ‘महा आवास अभियान- २०२०-२१’ मधील विशिष्ट १० उपक्रमांत संख्यात्मक प्रगतीनुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना खालीलप्रमाणे ‘महा आवास अभियान विशेष पुरस्कार’पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

  • सर्वात जास्त भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- जळगाव – प्रथम, अमरावती – द्वितीय, अहमदनगर – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- गोंदिया – प्रथम, बुलढाणा – द्वितीय, नाशिक – तृतीय.
  • सर्वात जास्त घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजूरी देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, भंडारा – द्वितीय, अमरावती – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- उस्मानाबाद – प्रथम, नांदेड – द्वितीय, बीड – तृतीय.
  • सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, नंदूरबार – द्वितीय, भंडारा – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, चंद्रपूर – व्दितीय, गोंदिया – तृतीय.
  • सर्वात जास्त बहुमजली इमारती उभारणारे जिल्हे : कोल्हापूर – प्रथम, सातारा – द्वितीय, बुलढाणा – तृतीय.
  • सर्वात जास्त गृहसंकुले उभारणारे जिल्हे : वर्धा – प्रथम, सातारा – द्वितीय, गोंदिया – तृतीय.
  • सर्वात जास्त घरकुल मार्ट सुरु करणारे जिल्हे : अमरावती – प्रथम, गोंदिया – द्वितीय, भंडारा – तृतीय.
  • सर्वात जास्त लाभार्थ्यांना वित्तीय संस्थांचे गृहकर्ज मिळवून देणारे जिल्हे : भंडारा – प्रथम, नांदेड – द्वितीय, सोलापूर – तृतीय.
  • सर्वात जास्त आदर्श घरांची निर्मिती करणारे जिल्हे : औरंगाबाद – प्रथम, सातारा – द्वितीय, नांदेड – तृतीय.
  • सर्वात जास्त कॉर्पोरेट, स्वयंसेवी आणि सहकारी संस्थांचे सहकार्य घेणारे जिल्हे : पालघर – प्रथम, अहमदनगर – द्वितीय, सोलापूर – तृतीय.
  • इतर विशेष उपक्रम : नाशिक – प्रथम, नागपूर – द्वितीय, सांगली – तृतीय.

हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख उपस्थित करण्याचे नियोजित असून पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

 


Tags: Ahmednagar DistrictGondia DistrictMaha Awas Abhiyan 2020-21Pradhan Mantri Awas Yojanarural areasState Level Awardअहमदनगर जिल्हागोंदिया जिल्हाग्रामीण भागप्रधानमंत्री आवास योजनामहा आवास अभियान 2020-21राज्यस्तरीय पुरस्कारहक्काचा निवारा
Previous Post

नाशिकमध्ये कृषि पुरस्कार प्रदान सोहळा, २ मे रोजी १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान!

Next Post

दणकट, रुबाबदार स्कॉर्पियोची क्रेझ!

Next Post
दणकट, रुबाबदार स्कॉर्पियोची क्रेझ!

दणकट, रुबाबदार स्कॉर्पियोची क्रेझ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!