Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे आवाहन

May 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari

मुक्तपीठ टीम

 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वाचविण्यात अपयश आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आता वैधानिक प्रक्रिया पूर्ण न करताच हा विषय केंद्र सरकारकडे सोपविण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रयत्नांमुळे आणखी कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊन मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार घडेल. मराठा आरक्षणाच्या बाबतीत केवळ कुरघोडीचे राजकारण न करता महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केले.

 

माधव भांडारी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सायंकाळी महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांना मराठा आरक्षणासंदर्भात भेटणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जाहीर म्हटल्याप्रमाणे या आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारवर सोपविण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. तथापि, १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणाची शिफारस करण्यापूर्वी राज्याच्या पातळीवर वैधानिक प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास असल्याची शिफारस करून ती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठविणे, नंतर ती राष्ट्रपतींकडे पाठविणे व त्यांच्या मंजुरीनंतर राज्याने आरक्षणाचा कायदा करणे अशी वैधानिक प्रक्रिया आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून त्यांच्याकडून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. तसेच हा अहवाल प्राप्त करून घेताना गायकवाड आयोगाच्या अहवालातील ज्या त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केल्या आहेत, त्या दूर करण्याचे काम देखील राज्य सरकारलाच करावे लागणार आहे. हा टप्पा पूर्ण केला तरच केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याला कायदेशीर अर्थ आहे. तथापि, तसे काहीही न करता केवळ जबाबदारी झटकण्यासाठी हा विषय नियमबाह्य पद्धतीने केंद्राकडे ढकलायचा आणि आणखी एक नवा कायदेशीर गुंता करून ठेवायचा, असा प्रयत्न महाविकास आघाडीने चालवलेला दिसतो.

 

कोणत्याही समाजाच्या भावनांशी सरकारने अशा प्रकारे खेळ करणे अत्यंत गैर आहे. महाविकास आघाडीने हा खेळ बंद करावा आणि हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहनही माधव भांडारी ह्यांनी केले आहे.

 


Tags: BJPchief minister uddhav thackeraymadhav bhandariमराठा आरक्षणमहाविकास आघाडीमाधव भांडारी
Previous Post

आज ४१ हजार नवे रुग्ण, ७२ हजार घरी परतले! मुंबई १,७१७! महाराष्ट्राची लवकरच ‘मुंबई’ व्हावी!!

Next Post

“काँग्रेसने कोरोना योद्ध्यांचे मनोधैर्य खच्ची करू नये!”

Next Post
sonia gandhi

"काँग्रेसने कोरोना योद्ध्यांचे मनोधैर्य खच्ची करू नये!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!