मुक्तपीठ टीम
कोणतंही चांगलं काम करायचं असेल आणि पैसा ही समस्या असेल तर लगेच मार्ग दाखवला जातो तो क्राउड फंडिंगचा. आता प्रथमच एका क्रिएटिव्ह कामासाठी या मार्गाचा उपयोग करण्यात आला आहे. निर्माते गौतम जोशी यांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ‘लव सॉरीज’ ही वेब सीरीज तयार केली आहे. शुक्रवारी एमएक्स प्लेयरसह इतर २० डिजिटल प्लॅटफॉर्मवर ती रिलीजही झाली आहे. त्यांनी क्राउड फंडिंगच्या निधीतून सव्वा कोटी जमा केले आणि ही सीरीज बनविली. यात एकूण चार कथा आहेत. पहिली कथा ‘स्ट्रॉबेरी’, दुसरी ‘डबल चीज’, तिसरी ‘केशर पिस्ता’, तर ‘अॅन्थॉलॉजी’ ची चौथी कथा एका वेगळ्या संकल्पनेवर आधारीत आहे. या सीरीजमध्ये प्रेमाच्या संकल्पनेवर एक वेगळा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. या सीरीजचे शुटिंग मध्यप्रदेशमधील वेगवेगळ्या भागात झाले आहे. या सीरीजच्या माध्यमातून आजच्या भारतीय तरूणांचे प्रेमाच्या बाबतीत जे विचार आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
एकमेकांशी संबंधित चार कथा
या सीरीजमध्ये एकमेकांशी संबंधित असलेल्या चार वेगवेगळ्या कथा आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्याला अॅन्थॉलॉजी म्हणतात. करणवीर शर्मा आणि अर्चना गुप्ता या सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या कहाणीचे नाव ‘स्ट्रॉबेरी’ असे आहे. बाकी मुख्य कलाकार म्हणजे मिस इंडिया असलेली स्टेफी पटेल, आकाश तलवार, पुनीत चौकसे, आकाश मखीजा, प्रतीक राव आणि ‘निमकी मुखिया’ मालिकेतील प्रियांशु सिंह असे हे कलाकार आहेत.
प्रेमाच्या संकल्पनेवर एक वेगळा दृष्टिकोन
१. या सीरीजमध्ये प्रेमाच्या संकल्पनेवर एक वेगळा टेक घेण्यात आला आहे.
२. या सीरीजचे शुटिंग मध्यप्रदेशमधील वेगवेगळ्या भागात झाले आहे.
३. या सीरीजच्या माध्यमातून आजच्या भारतातील तरूणांचे प्रेमाच्या बाबतीत जे विचार आहेत त्यांना सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पाहा व्हिडीओ: