मुक्तपीठ टीम
आदिवासींच्या जीवनात माणूसपणाची पहाट उगवणाऱ्या बाबा आमटेंचं कार्य पुढे नेणारे डाॅ. प्रकाश आमटे. लोकबिरादरीच्या माध्यमातून चालणारं त्यांचं काम खूप मोठं. त्याचबरोबर हळवेपणानं त्यांनी जोपासलेलं प्राणीप्रेमही आपल्या सगळ्यांनाच भावणारं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलणारे पुण्यातील लोकबिरादरी मित्र मंडळ नेहमीच वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असतं. आताही या मित्र मंडळाने शेपटीवाल्या प्राण्यांची फनफेअर सभा भरवण्याचं नक्की केलंय.
लोकबिरादरी मित्र मंडळाचं निवेदन पुरसं बोलकं आहे, “विकास आमटेंचे फोटो पाहिले, क्लिप्स-मुलाखती पाहील्या की जाणवतं, त्यांचं प्राण्यांचं जग किती वेगळं आहे. निरपेक्ष आहे. ज्या घरांमध्ये हे चार पायांचं चैतन्य प्रवेश करतं, त्या घरांचं छोट्टसं विश्व हे नवीन आलेलं पिल्लू नखशिखांत बदलीन टाकतं. गेल्या दोन वर्षात तर या पिल्लांनी असंख्य कुटुंबीयांना अपार प्रेम आणि आधार दिला आहे.
विकास आमटेंसारखेच आपल्यातीलही अनेकांना असे प्राणी आपले वाटतात. घरातीलच ते एक झालेले असतात. अशा लाडक्या पिल्लांची, आपल्याच अपत्याची एखादी तरी छोट्टीशी गोष्टं ही फोटो किंवा व्हिडीओ स्वरुपात तुमच्या संग्रहात असेलच ना? तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्यांचे फोटो, करामती, उद्योग पाठवायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
चला तर मग, पुण्याच्या लोकबिरादरी मित्रमंडळ आयोजित Online Fun Fair With Paws & Tails Season 4 मध्ये लगेचच सहभागी होऊया!
सहभागासाठी नितीन 8010567259 आणि ऐश्वर्या 7875571679 यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी तुम्ही मुक्तपीठच्या वेबपोर्टलवरील चांगल्या बातम्या कॅटेगरी तपासा. सर्व लिंक तुम्हाला सापडतील.
🐶 तुमच्या पेट्सचे फोटो/व्हिडीओ/गोष्टी पाठवायचा ईमेल आयडी- lokbiradarimitramandalpune@gmail.com
🐶 सहभाग देणगीशुल्क – रू. २५०/- फक्त
🐶 ही देणगी हेमलकसा येथील पिल्लांसाठी सुपूर्त करण्यात येणार असल्याने, तुम्ही ईच्छा असल्यास २५०/- पेक्षा जास्त रक्कमही देऊ शकता!
🐶 सहभाग नोंटणीसाठी फाॅर्मची लिंक-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfYSLrS9_iQZkkdkWb1DleCNM4ujYZFkvqbWixMSffGG96cyg/viewform?usp=pp_url
🐶 अधिक माहीतीसाठी संपर्क-
Nitin- 8010567259
Aishwarya (Registration gpay no.)- 7875571679
🐶 आपल्यासारख्या ईतर प्राणीमित्रांनाही या बातमीची लिंक पाठवायला विसरू नका!