Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींनी जे नको म्हटलं तेच घडणार? देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा प्रस्ताव!

April 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
narendra modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना देशाला लॉकडाऊनपासून वाचवलं पाहिजे, असे मत मांडले होते. तो शेवटचा पर्याय असावा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. त्यांचं मत लॉकडाऊन नसावं असंच दिसत असल्याने भाजपाशासित राज्यांमध्ये थेट लॉकडाऊन टाळले जात होते. आता मात्र मोदी जे आधी नको म्हणाले होते तेच करावं लागण्याची शक्यता आहे. देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचा प्रस्ताव केंद्राच्या आरोग्य खात्यानं दिला आहे. या जिल्ह्यांमधील कोरोना तपासणीत पॉझिटिव्हीटचा दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त आढळत आहे. तिथे संसर्ग साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी उच्चस्तरीय बैठकीत १५० जिल्ह्यांमध्ये कठोर पावलं उचलण्याची सूचना केली होती. परंतु राज्य सरकारांशी सल्लामसलत केल्यानंतर अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. या प्रस्तावात काही बदल केले जाऊ शकतात, परंतु सध्या आरोग्य मंत्रालयाने जास्त संसर्ग दर असलेल्या जिल्ह्यांत कठोर निर्बंध लादून कोरोनावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे.

देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन का आवश्यक?

  • आरोग्य खात्याच्या अभ्यासानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हिटी दर खूप जास्त आहे तेथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील काही आठवड्यांसाठी लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि तामिळनाडू ही देशातील अशी आठ राज्ये आहेत जिथे दररोज कोरोनाची एक लाखाहून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे.
  • आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान वाढत्या संसर्ग दरांबद्दल चिंता व्यक्त केली आहे कारण यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ओझे वाढते.
  • केंद्राने यापूर्वीच राज्यांना अनावश्यक हालचालींवर प्रतिबंध घालण्यास सांगितले आहे.

Tags: coronalockdownNarendra modipositivity rateकेंद्रीय आरोग्य मंत्रालयकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीपॉझिटीव्हिटी दरमहाराष्ट्रलॉकडाऊन
Previous Post

मनानं काँग्रेसी, जगण्यात धारावी! एकनाथ गायकवाडांचं निधन…

Next Post

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!