मुक्तपीठ टीम
सध्या उत्तरप्रदेशातील लखीमपूरचे शेतकरी हत्याकांड जगभर गाजत आहे. निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणे हे अतिशय भयानक आणि क्रूर कृत्य आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनींचा मुलगा आशिष मिश्राविरोधात शेतकऱ्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा एक लाइव्ह नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही शेतकरी कारच्या धडकेनंतर जमिनीवर पडल्याचे दिसून येत आहे, तर काहीजण जीव वाचवत पळताना दिसत आहेत. मात्र, शेतकऱ्यांपैकी कुणीही गाडीखाली चिरडण्याच्याआधी आक्रमक झालेलं नव्हतं हेही स्पष्ट दिसत आहे. आपचे नेते संजय सिंह आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
.@narendramodi जी आपकी सरकार ने बग़ैर किसी ऑर्डर और FIR के मुझे पिछले 28 घंटे से हिरासत में रखा है।
अन्नदाता को कुचल देने वाला ये व्यक्ति अब तक गिरफ़्तार नहीं हुआ। क्यों? pic.twitter.com/0IF3iv0Ypi
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2021
व्हिडीओमध्येकाय दिसतंय?
- शेतकरी हातात झेंडे घेऊन शांतपणे पुढे जाताना दिसत आहेत.
- त्याचवेळी सायरन वाजवत मारेकरी गाडी मागून येते.
- ती गाडी अनेक शेतकरी बांधवाना पायदळी चिरडते.
- भरधाव जीपच्या धडकेत अनेक जण जखमी होऊन पडताना दिसत आहेत.
- जीपच्या धडकेनंतर एक वृद्ध बोनेटवर आदळतात आणि नंतर जमिनीवर कोसळतात.
- व्हिडीओमध्ये जीपच्या मागे एक एसयूव्ही देखील दिसत आहे.
- सर्वात धक्कादायक बाब अशी की, शेतकऱ्यांना धडक दिल्यानंतरही ना जीप थांबत ना मागून येणाऱ्या काफिल्यातील गाड्या. त्याही तशाच भरधाव निघून जात आहेत.
क्या इसके बाद भी कोई प्रमाण चाहिये?
देखिये सत्ता के अहंकार में चूर गुंडे ने किसानो को अपनी गाड़ी के नीचे कैसे रौंदकर मार दिया कुछ चैनल ज्ञान दे रहे थे मंत्री का बेटा जान बचाने के लिए भागा।#किसान_हत्यारी_भाजपा pic.twitter.com/D9Mb4Iu7qm— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) October 4, 2021
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी नेत्यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आधी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि नंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. परंतु पोलिसांनी अजूनही या व्हिडीओची दखल घेतलेली नाही आहे, तसेच ही गाडी कोण चालवत आहे हे स्पष्ट झालेले नाही. लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रियांका गांधी असेही म्हणाल्या की, मला कोठडीत ठेवण्यात आले आहे, आणि अन्नदात्याला चिडणाऱ्या व्यक्तीला अजून अटक झालेली नाही.
केंद्रीय मंत्र्याच्या मुलासह चौदा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
- लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह १४ जणांविरुद्ध खुनाचा आणि गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- बहराइचमधील नानपारा येथील रहिवासी जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा टिकुनिया पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
- दुसरीकडे, मंत्री अजय मिश्रा यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून, टिकूनिया पोलीस ठाण्यात हत्या, प्राणघातक हल्ला आणि अज्ञात शेतकऱ्यांवर हल्ला केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकार आणि शेतकरी यांच्यात करार
लखीमपूरमधील सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये एक करार झाला आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाखांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर सर्व मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीही देण्यात येईल. यासह, घटनेची न्यायालयीन चौकशी आणि आरोपींना 8 दिवसात अटक करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.