मुक्तपीठ टीम
सरकारच्या उमंग अॅपने मॅप माय इंडियासह भागीदारी केली आहे. यामुळे आता उमंग अॅपवर पोलीस स्टेशन, सरकारी रेशन दुकाने, ब्लड बँक यांसारखी सरकारी कार्यालये आणि दुकानांचे लाईव्ह लोकेशन उपलब्ध होईल. अॅपवर फक्त ठिकाणांचीच माहिती मिळणार नाही, तर तुम्हाला सरकारी सेवा केंद्रांच्या इमारती, त्यांच्या रस्त्यांविषयीही सखोल माहिती मिळेल. तसेच, आपल्या येथून सरकारी सेवा केंद्र किती दूर आहे. ही माहिती देखील मिळू शकते. संबंधित ठिकाणे अॅपवर लाइव्ह पाहिली जाऊ शकतात. तसेच व्हॉईस आणि व्हिज्युअल्सला ही हे सपोर्ट करेल. यामुळे सरकारी कार्यालये शोधणे आणि तेथे पोहोचणे सुलभ होईल. यासह, नेव्हिगेशन दरम्यान रहदारी आणि रस्ता सुरक्षेचा तपशील देखील उपलब्ध असेल.
उमंग अॅपद्वारे ग्राहकांना मिळणार विविध सेवा
• उमंग अॅपवर सर्वात जवळच्या सरकारी रेशनिंग दुकानाची माहिती मिळते.
• ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट्स’ म्हणजेच वीज पडण्याआधी माहिती मिळेल आणि लोकांना सावधान करेल. वीज पडणाऱ्या भागात लोकांना सतर्क केले जाईल.
• ईएसआयसीवर वापरकर्त्यांना ईएसआयसी केंद्राचे स्थान मिळेल. जसे दवाखाने आणि रुग्णालयांचे लाईव्ह लोकेशन मॅपवर मिळेल.
• इंडियन ऑइलवर जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपच्या रिटेलर्स आणि डिस्ट्रीब्यूटर्सचे लोकेशन मिळेल. तसेच, गॅस स्टेशन आणि इंधन भरण्याचे स्टेशन यांचे लोकोशन मिळेल.
• एनएचएआयवर वापरकर्त्यांना टोल प्लाझा आणि टोल रेटची माहिती मिळू शकेल.
• जवळचे पोलिस स्टेशन शोधता येते.
• मेरी सडकवर वापरकर्त्यास खराब रस्त्याबद्दल तक्रार करता येईल.
उमंग अॅप केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. उमंग मोबाइल अॅप पंतप्रधान मोदी यांनी सन २०१७ मध्ये लॉन्च केला होता. उमंग अॅपवर सुमारे १२५१ सरकारी सेवा आणि सुमारे २०,२८० उपयुक्तता बिल देय सेवा उपलब्ध आहेत. उमंग अॅप ३.४१ कोटीहून अधिक वेळा डाउनलोड केला गेला आहे.
उमंग अॅप डाउनलोड कसा करावा
• उमंग अॅप हा ९७१८३-९७१८३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन डाउनलोड केला जाऊ शकतो.
• या व्यतिरिक्त https://web.umang.gov.in/web/#/ वरून देखील डाउनलोड केला जाऊ शकतो.
• अॅन्ड्रॉइड वापरकर्ते https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c वर क्लिक करुन अॅप डाउनलोड करू शकतात.
• आयओएस वापरकर्ते https://apps.apple.com/in/app/umang/id1236448857 वरून उमंग अॅप डाउनलोड करू शकतात.