मुक्तपीठ टीम
आपल्या शरीराचा एक एक अवयव हे महत्वाचे आहे. जर एखादा अवयव नसेल तर जीवन परावलंबी बनण्याची भीती असते. ज्यांच्याकडे धडधाकट शरीर आहे, अशांपैकी अनेकांना त्याचे मोल माहित नसते, पण ज्यांच्याकडे ते नाही त्यांना विचाराल तर त्याचं मोल कळतं. अशा कमतरतेवरही मात करत कर्तृत्व गाजवणारे अनेक प्रेरणादायी दिव्यांग सभोताली असतात. पण एखाद्या दिव्यांगाच्या शरीरातील उणीव भरून काढली, तर त्याला होणाऱ्या आनंदानाची तुलनाच होऊ शकत नाही. तो आनंद अनमोलच. एका लहान मुलाचा असा आनंद दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्या मुलाचा चेहऱ्यावरचा निरागस आनंद हा पाहण्यासाठी नेटकरी वारंवार तो व्हिडीओ पाहत आहेत, दुसऱ्यांनाही पाठवत आहेत. अशी निरागस, आनंददायी चांगली बातमी आगळीच.
लहानग्या मुलाला हात मिळतो…चेहऱ्यावरचा आनंद जगावेगळा निरागस असा!
- Amazing Post या ट्वीटर हँडलने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
- या व्हिडीओमध्ये एक लहान मूल बसलेले दिसते.
- त्यात डॉक्टर त्याला कुत्रिम हात लावताना दिसत आहेत.
- जेव्हा डॉक्टरांनी या लहान मुलाला कुत्रिम हात लावला तेव्हा तो आनंदाने आपल्या हाताकडे पाहतोय.
- त्या लहानग्याला एवढा आनंद होतो की तो वारंवार त्याला स्पर्श करतोय, तो डॉक्टरकडे पाहतो, हसतो.
- त्याच्या पालकांकडे पाहूनही तो हसतोय.
- त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक अनमोल हास्य बहरले आहे.
हा व्हिडीओ शेअर करत ट्वीटमध्ये ‘मुलाला त्याचा पहिला कृत्रिम हात मिळाल्यावर होणारा आनंद.’ एवढंच लिहिलंय. पण त्या व्हिडीओतील भाव असे आहेत की मन राहवत नाही, वारंवार तो व्हिडीओ पाहावा असं वाटत राहतं. जगात मुलांना खुश करण्यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही.
हा व्हिडिओ पाहून लोक भावूक होत आहेत. एका ट्विटरकराने लिहिले की, त्याने इतका सुंदर व्हिडिओ कधीच पाहिला नाही. मुलाला हात मिळाल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले की कदाचित ही त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट असावी!