Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lions Pair

मुक्तपीठ टीम

भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे ; अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतिक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी आज उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे असे उद्गार वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

Lions Pair

गुजरात येथुन आणलेल्या सिंहांची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

वन ग्रंथालयाचे भूमीपूजन आणि सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्राचे उद्घाटन यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, सतीश वाघ, आमदार प्रकाश वाघ, प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकर्जुन, क्लामेंन्ट बेन उपस्थित होते.

आपल्या भाषणादरम्यान सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, संजय गांधी उद्यानात मुक्त करण्यात आलेल्या सिंहांना भारतीय स्टेट बँकेने दत्तक घेतले याचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. वनांचे काम मनापासून करा, हे ईश्वरीय कार्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ईश्वराची देण आहे; वसुंधरा म्हणजे पृथ्वीच्या जडणघडणीत देवाने आर्किटेक्ट म्हणून भूमिका निभावली, त्या अमूल्य वसुंधरेच्या संवर्धनाची जबाबदारी सारे मिळून सांभाळू या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
.
संजय गांधी उद्यानातील सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजराचे (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्र हे देशातील एकमेव संवर्धन केंद्र आहे, ते देखील आपण जपू या असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी वन ग्रंथालय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात भर घालेल, असे मत व्यक्त केले. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, ना.सुधीर मुनगंटीवार दूरदृष्टी असणारे महाराष्ट्रातील नेते आहेत. त्यांच्या पूर्वीच्या व आताच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्र चौफेर प्रगती करत आहे.

खासदार शेट्टी यांनी मंत्रिपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये

सुधीरभाऊंनी कामाचा झंझावात कायम ठेवला. हा झंझावात नुसता कायम ठेवला नाही तर तो दुपटीने वाढविला, बोरीवली येथील जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात मुनगंटीवार यांनी भर घातली. या उद्यानाकडे पर्यटकांचा ओढा वाढावा, यासाठी उपाय करण्याची मागणी त्यांनी केली. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याचा वनविभाग उत्कृष्ट प्रगती करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

उद्यान व्हावे ज्ञानाचे केंद्र!

Lions Pair

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेन चालवण्यात येते. ही ट्रेन केवळ पर्यटन आणि मनोरंजना पुरती मर्यादित राहू नये, तर ती ज्ञानदानाचे केंद्र बनावी, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चंद्रपुरात अलीकडेच ‘टॉकिंग ट्री’चा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे असेच आधुनिक उपक्रम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राबविले जावे, असे ते म्हणाले.

नगरसेवकांना दिला कानमंत्र!

संजय गांधी उद्यानातील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगरसेवकांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यशाचा कानमंत्र दिला. जंगल आणि पर्यावरणासाठी जे अनमोल क्षण देतात, ते पुन्हा पुन्हा निवडून येतात, असे सांगत मुनमंटीवार यांनी नगरसेवकांनाही पर्यावरण संवर्धन आणि यश याचा मंत्र दिला.


Tags: LionsMaharashtramumbaiSanjay Gandhi National Parksgnp
Previous Post

कुणीतरी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुर्दैवाने इथल्या राज्यसरकारने बघ्याची भूमिका घेतलीय – शरद पवार

Next Post

‘कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये’ – छगन भुजबळ

Next Post
Chhagan Bhujbal on OBC reservation 10-12-21

'कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये' - छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!