मुक्तपीठ टीम
एकीकडे अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्याचं अजब कारण देत महाराष्ट्रातील आघाडी सरकारनं चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दारूबंदी उठवण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांची त्यामुळे बारमालक आरती करत असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. दारूबंदीविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या वडेट्टीवारांनी आवर्जून वाचावी अशी माहिती समोर आली आहे. संपूर्ण जगात गेल्या वर्षी कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी ७ लाख ४१हजार ३०० म्हणजेच ४ टक्के रुग्णांना दारुमुळे कर्करोग झाला होता.
दारु आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे सर्वच लोकांना माहित आहे. तरीही दारूचे व्यसन सोडण्यास लोक तयार नसतात. दारुमुळे कर्करोग होतो.
२०० पेक्षा जास्त देशांमधील दारु विक्रीचे रेकॉर्ड मिळवून एक सांख्यिकी अहवाल तयार केला गेला. २०२०मधील दारू पिण्याचे प्रमाण आणि इतर डेटा २०२० मध्ये कर्करोग रुग्णांच्या संख्येशी जोडला गेला. यानंतर जगभरातील देशांची यादी तयार केली गेली.
दारु – कर्करोग आकडेवारीनुसार देशांची यादी
• ब्रिटन ३८ व्या स्थानावर आहे. येथे १६,८०० नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळले आहेत.
• अमेरिकेत कर्करोगाच्या जवळजवळ ३% प्रकरणे आहेत. रूग्णांची संख्या ५२,७०० एवढी आहे.
• मंगोलियाने या यादीत प्रथम क्रमांकावर असून कर्करोगाच्या प्रत्येक १० पैकी एक रुग्णाला कर्करोग झाला आहे.
• त्याचप्रमाणे कुवैत येथेही दारुशी संबंधित कर्करोगाचे प्रमाण सर्वात कमी आहे.
महिलांमध्ये दारुमुळे कर्करोगाचा धोका कमी
• जागतिक स्तरावर, पुरुषांपेक्षा दारु पिण्यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण महिलांमध्ये कमी आहे.
• या अभ्यासानुसार, दारुमुळे ७७% पुरुष आणि २३% महिलांना कर्करोग झाला.
• पुरुषांमधील प्रत्येक सात प्रकरणांपैकी एक प्रकरण दारुचं अतिसेवनांसंबंधित आहे.
चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!