Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

स्टोरीटेल ओरिजनलच्या ‘शांती भवन’मधील गूढ रहस्य लीना भागवत उलगडणार!

December 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
storytell

मुक्तपीठ टीम

चित्रपट, मालिका आणि नाटकांद्वारे प्रेक्षकांवर अभिनयाचे वलय निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री व लेखिका लीना भागवत स्टोरीटेल ओरिजनलच्या ‘शांती भवन’ या ऑडीओ सिरीजद्वारे एक आगळेवेगळे गूढ रहस्य स्टोरीटेल मराठीच्या साहित्यप्रेमींसाठी घेऊन आल्या आहेत. ‘शांती भवन’चे लेखन गीतांजली भोसले या प्रतिभासंपन्न लेखिकेने केले असून अनेक उत्कंठावर्धक गूढ रहस्यमय घटना शांती भवन’मध्ये दडलेल्या असून अद्भुतकथा अभिनेत्री लीना भागवत यांच्या वाणीतून ऐकायला मिळणार असून सोबत कुतूहल चाळविणाऱ्या रंजक पार्श्वसंगीताची जोड असल्याने ‘शांती भवन’ स्टोरीटेल ओरिजनलच्या रसिकांसाठी पर्वणी असणार आहे.

 

मराठी चित्रपट, टेलिव्हिजन व नाट्यसृष्टीतील चोखंदळ अभिनेत्री असा लौकिक असलेल्या अभिनेत्री लीना भागवत यांनी भरमसाठ भूमिका करण्यापेक्षा दर्जेदार कलाकृतींना पसंती देत रसिकांचे टेलिव्हिजन, चित्रपट, नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अमोल पालेकरांच्या ‘कैरी’, सचिन कुंडलकर यांच्या ‘गंध’, राजेश देशपांडे यांच्या ‘धुडगूस’ तसेच ‘इश्कवाला लव्ह’, ‘वाघिऱ्या’, ‘पाच नार एक बेजार’, ‘फक्त तुझ्याचसाठी’, ‘आजचा दिवस माझा’, ‘डोह’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘हाथी का अंडा’, ‘जोडीदार’, ‘झाले मोकळे आकाश’ इत्यादी चित्रपट, ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘अधांतर’, ‘चल तुझी सीट पक्की’.. अशी रंगभूमीवरील अनेक दर्जेदार नाटके व ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘होणार सून मी या घरची’ तसेच ‘फू बाई फू’ हा स्टॅण्डअप कॉमेडी शो आणि लॉकडाऊनमध्ये ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ मधील भूमिकांतून त्यांनी रसिकांच्या मनात अतूट नाते विणत ‘स्टोरिटेल मराठी’साठी ‘नैवेद्य’, ‘नॉट माईन’, ‘माया महा ठगनी’, ‘बाईच्या आनंदाची व्याख्या’, अश्या दर्जेदार ‘ऑडीओ बुक्स’द्वारे आपल्या आवाजातून प्रेक्षकांना भुरळ घालीत रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.

 

आधीच धाकधुकीनं भरलेल्या गायत्रीच्या मनातली कालवाकालव शांती भवनमध्ये पोहोचल्यावर आणखीनच वाढली आहे. त्या बंगल्यातली सगळी माणसं साधी सरळ वाटत असली तरी तिच्यापासून काहीतरी लपवलं जातंय हे पहिल्याच भेटीत तिच्या लक्षात येतं. रात्र झाली तसा शांती भवनचा भकासपणा गायत्रीला जास्तच जाणवू लागतो. पहिल्याच रात्री गायत्रीला काही विचित्र अनुभव आले आणि त्यातच अनन्या, धैर्य आणि ध्रुव निरागस असले तरी त्यांच्या काहीशा वियर्ड वागण्या-बोलण्याने ती पुरती भांबावून जाते. शांती भवनमधे, आजूबाजूला कुणी दिसत नसतानाही कुणीतरी असल्याचे वारंवार होणारे भास गायत्रीला अस्वस्थ करू लागतात. यात भर म्हणून अनन्या, धैर्य, आणि ध्रुव यांच्या आईच्या मृत्यूमागचं खरं कारण गायत्रीला समजत आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. बंगल्यात नक्कीच काहीतरी अघटित घडतंय आणि तिला येणारे विचित्र अनुभव हे फक्त भास नाहीत हे गायत्री इतरांना पटवून देण्यात यशस्वी होते का ? सगळेजण तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात का ? गायत्री या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी होते का ? अश्या अनेक रहस्यांची उकल करून घेण्यासाठी स्टोरीटेल ओरिजनलचा हा सस्पेन्स थरार नक्की ऐका.

 

गीतांजली भोसले या हरहुन्नरी लेखिकेच्या विलक्षण कल्पनाविलासातून निर्माण झालेल्या ‘शांती भवन’ या ऑडिओ मालिकेत लीना भागवतांच्या जादुई आवाजाने किमया साधली असून रसिकांवर मोहिनी घालण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. गायत्रीच्या मनातली कालवाकालव असो कि अनन्या, धैर्य आणि ध्रुवची निरागसता असो, सर्वच व्यक्तिरेखा ठसठशीत दाखविण्यासाठी त्यांनी केलेला सखोल अभ्यास ही ऑडिओ मालिका ऐकताना दिसून येतो. या गूढ रहस्यमय घटनांची उकल करण्यासाठी आपल्याला स्टोरीटेलवरील ‘शांती भवन’ ही सिरीज ऐकायलाच हवी.

 

स्टोरीटेलवर ‘शांती भवन’ मधील गूढ रहस्यांचा थरार’ ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

 

ही सिरीज स्टोरिटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/series/70118?appRedirect=true


Tags: Geetanjali BhosleLeena BhagwatShanti BhavanSTORYTELगीतांजली भोसलेलीना भागवतशांती भवनस्टोरीटेलस्टोरीटेल ओरिजनल
Previous Post

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नेत्यांचे अभिवादन, पक्ष पंथ भेद विसरत एकवटले सारे!

Next Post

ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती!

Next Post
Supreme court

ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!