मुक्तपीठ टीम
मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी श्रीमती निलिमा चिमोटे यांना केंद्र शासनाच्या केंद्रीय नागरी सेवा आणि सांस्कृतिक, क्रीडा मंडळाच्या वतीने बॅडमिंटन क्रीडा प्रकारातील योगदानाबद्दल ‘जीवनगौरव‘ प्रशंसा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, त्याबद्दल त्यांचा आज माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निलिमा चिमोटे या जून १९९३ पासून बॅडमिंटन क्रीडा प्रकारातील खेळाडू असून त्यांनी अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. नुकत्याच हरियाणात संपन्न झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धेत निलिमा चिमोटे यांना केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील केंद्रीय नागरी सेवा आणि सांस्कृतिक, क्रीडा मंडळाच्या वतीने ‘जीवन गौरव‘ प्रशंसा पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या योगदानाबद्दल आज, माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी निलिमा चिमोटे यांचा सत्कार करुन त्यांच्या बॅडमिंटन क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
यावेळी संचालक (वृत्त-जनसंपर्क) अनिल आलूरकर, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदी उपस्थित होते.