Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यभरातील ३६ कारागृहांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी उमटले “जीवनगाणे गातचं जावे”चे सूर…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Central Jail Cultural Programme

मुक्तपीठ टीम

छोट्या मोठ्या चुकांमुळे कैदी बनून आयुष्य जगणाऱ्या बनलेल्या अनेकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला.. निमित्त होते, “जीवन गाणे गातचं गावे”… या अनोख्या कार्यक्रमाचे… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, राज्यातील ३६ प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आज आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला.

Central jail

“जीवन गाणे गातच जावे…” या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात आयोजन होण्याची ही घटना, देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले हे या कार्यक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य!

Central Jail

राज्यात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. या महोत्सवात अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक म्हणजे राज्यातील प्रमुख कारागृहात सांस्कृतिक, समुपदेशनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली बिभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या कार्यक्रमासाठी एकूण 36 कला समूह निवडण्यात आले होते. एक महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गृह विभागाच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले होते. या कार्यक्रमांत 1000 हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. बहुतांश कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, न्यायाधीश उपस्थित होते. कारागृहातील कैद्यांसाठी झालेल्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रम ही आयोजित केले होते.

Central Jail

कारागृहातील कैद्यांचे उत्कृष्ट सादरीकरण “जीवन गाणे गातच जावे…” या कार्यक्रमात कारागृहातील अनेक कैद्यानी सादरीकरणात सहभाग घेतला. काही कैद्यांनी अप्रतिम वादन, गायन, काव्यवाचन आणि नृत्य करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला. कैद्यांमधील कलाकार पाहण्याची दुर्मिळ संधी यावेळेस सर्वांना मिळाली. अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार करावे, अशी अपेक्षाही अनेकांनी केली. जाणते आजाणतेपणाने झालेल्या चुकांमुळे, शिक्षा भोगावी लागत असल्याचे काही कैद्यांनी स्पष्ट केले. मात्र आजच्या कार्यक्रमामुळे नवी दिशा मिळाली असून, भावी आयुष्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, अशी आशाही अनेकानी व्यक्त केली. कार्यक्रमाचे शीर्षक “जीवन गाणे गातच जावे..”, यामुळे ही एक नवी ऊर्जा मिळाली असून, जीवनात नवा अध्याय सुरू करणार असल्याची भावनाही काही कैद्यांनी बोलून दाखवली.

Central Jail

राज्याच्या गृहविभागाचे सहकार्य राज्याच्या गृह विभागाने या उपक्रमासाठी सर्व सहकार्य केले. तुरुंग प्रशासन आणि गृह विभाग यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे कार्यक्रम होऊ शकले. राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुरुंग प्रशासनाला आदेश देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले होते. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा पुणे, सुनील रामानंद यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. हेमंत पवार संशोधन अधिकारी, कारागृह व सुधार सेवा यांनी याबाबत योग्य तो समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Central Jail

कलाकारांच्या प्रतिक्रिया कारागृहातील कैद्यांसाठी कार्यक्रम करणे हे कलाकारांसाठी आव्हान होते व हा एक वेगळा अनुभव होता असे अनेक कलाकारांनी नमूद केले. या कार्यक्रमांमधून मनोरंजन व प्रबोधन करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक कलाकारांनी शासनाचे आभार मानले.

Central Jail

कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी, असे कार्यक्रम कारागृहात प्रथमच होत असल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करून आभार मानले. तसेच असे कार्यक्रम वारंवार आयोजित करावेत जेणेकरून कैद्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन होऊ शकेल आणि त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वादी घेता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या धर्तीवरच पुढील महिन्यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील वृद्धाश्रमांतही अशाच प्रकारचे कार्यक्रम होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक यांनी स्पष्ट केले आहे.

Central Jail

भायखाळा जिल्हा करागृह येथे महिला बंद्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या याकार्यक्रमाच्या वेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक  संदीप शेंडे व कारागृह अधीक्षक यशवंत भानुदास फड यांनी बंद्यांना मार्गदर्शन केले. तसेच ए. टी. पाटील, वरिष्ठ तुरुंगाधिकारी यांनी आभार मानले.


Tags: Amrit Mahotsav of FreedomjailMaharashtraभायखाळा जिल्हा करागृहस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
Previous Post

टपाल कार्यालयांमधून १० दिवसांमध्ये एक कोटी राष्ट्रध्वजांची विक्री!

Next Post

मुंबईतील वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
Backward class womens

मुंबईतील वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!