मुक्तपीठ टीम
जर एलआयसी पॉलिसी संपली असेल तर, ती पुन्हा सुरू करण्यासाठी आता २२ ऑक्टोबरपर्यंत संधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने २३ ऑगस्टपासून एक विशेष रिव्हायवल मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, बंद असलेली पॉलिसी २३ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर दरम्यान कधीही सुरू करू शकता.
रिव्हायवल मोहिमेअंतर्गत ग्राहकाला यासाठी एकूण प्रीमियमवर सूट दिली जाईल. तसेच, ज्या काही वैद्यकीय आवश्यकता असतील त्यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. लेट फी मध्ये मॅक्रो इन्शुरन्स आणि हेल्थ या दोन्हीवरील लेट फी माफ केली जाईल. या रिव्हायवल मोहिमेअंतर्गत, विशेष विमा सुरू केले जाऊ शकतात. ज्या ५ वर्षांपेक्षा कमी काळ बंद पडल्या आहेत. तसेच, टर्म इन्शुरन्स आणि इतर पॉलिसींवर कोणतीही सूट मिळणार नाही. यासाठी पूर्ण शुल्क भरावे लागेल. असे एलआयसीने म्हटले आहे.
३०% पर्यंत मिळणार सूट
- १.१ लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमसह विम्यावर २० टक्के सूट किंवा जास्तीत जास्त २ हजार रुपये उपलब्ध असतील.
- तर, १ रूपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत वार्षिक प्रीमियम असलेल्या पॉलिसींना २५% किंवा जास्तीत जास्त २५०० रुपयांची सूट मिळेल.
- ३ लाखांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या पॉलिसींसाठी ३०% किंवा जास्तीत जास्त ३ हजार रुपयांची सूट उपलब्ध असेल.
या रिव्हायवल मोहिमेअंतर्गत, त्या विमा योजना समाविष्ट केल्या जातील, ज्या पॉलिसीची मुदत पूर्ण करतात आणि प्रीमियम भरण्याच्या निकषांची पूर्तता करतात. एलआयसीने म्हटले आहे की, जे ग्राहक काही कारणास्तव वेळेवर प्रीमियम भरू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला जुन्या पॉलिसीचे कव्हर मिळेल.