मुक्तपीठ टीम
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यातल्या वादाला आता वेगळचं वळण मिळालं आहे. किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळदेखील करण्यात आली आहे. याबाबत महापौर पोलिसांत तक्रार देणार आहेत.
Kisho
काय आहे पत्रात?
- माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं पाहू नका.
- काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे.
- या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे.
- महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे.
- माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
- हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलेलं आहे.
- पत्राच्या पाकिटावर वेगळं नाव आहे.
- पत्रात वेगळं नाव आहे.
- खारघर, पनवेल आणि उरण अशा ३ ठिकाणांचा यात उल्लेख आहे.
- हे निनावी पत्र आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर पत्र येतच असतात, असं सांगितलं. त्यामध्ये ते पत्र होतं.
- जी पत्र येतात ती सगळीच पत्र उघडतो.
- हे पत्र जुन्या घराच्या पत्त्यावर आलं आहे. त्याचा पत्ता चुकलेला होता पण ते आलेलं आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
- ते पत्र अत्यंत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख त्यात आहे.
- घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे.
- पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे.
- बाहेर वेगळं नाव आहे.
- मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे.
- आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल,मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे.








Subscribe