Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘झेंडा फडकावूच’ पण जनतेच्या मुलभूत प्रश्नांचे काय? अमोल वेटम

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Amol vetam

अमोल वेटम

समाजातील मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्षित करून जात, धर्म, भाषा, स्त्री पुरुष, यांच्या नावाने राजकारण करून समाज मन दुषित केले जात आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्त्री अधिकार, अत्याचार, शेती, पाणी, पर्यायावरण, सामाजिक न्याय, कायदा व सुव्यवस्था, पेट्रोल गँस दरवाढ, महागाई, कोट्यावधी प्रलंबित खटले याकडे सरकार कानाडोळा करत आहे. आपल्या समाजाची प्रचलित स्थिती सुधारण्यासाठी या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्या विचारात घ्यायच्या आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, रस्त्यांची दुरवस्था, राजकीय घोडेबाजार आदी मुद्द्यांवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात बेरोजगारीने घातलेले थैमान, केंद्र सरकारच्या नोकरीसाठी जवळपास २२ कोटी बेरोजगार उमेदवारांनी गेल्या ७ वर्षात अर्ज केले त्यातील केवळ ७.२२ लाख विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. यातून देशातील बेरोजगारीचे भीषण चित्र उभे राहते. राज्यात २ लाख १९ हजार पदे रिक्त आहेत. या जागा देखील भरल्या जात नाहीत. लॅटरल एन्ट्री माध्यामतून मागील दारातून भरती सुरु आहे. ‘स्टँड अप इंडिया’ करिता दहा हजार कोटी तरतूद करून अडीच लाख उद्योजक घडविण्याचे पोकळ आश्वासन सरकारने दिले पण प्रत्येक्षात मात्र चार वर्षात या योजनेचे एकही लाभार्थी ठरले नसल्याचे चित्र आहे. अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.

युएनच्या अहवालानुसार ७०० दशलक्ष लोक आहेत ज्यांच्या घरी शौचालये नाहीत. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज ही आव्हाने आहेत. सांगली मिरज कुपवाड मनपा अंतर्गत शाळांमध्ये ना संगणक, ना इन्टरनेट सुविधा आहे. तर सेतू, चावडी तसेच इतर शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार कोण रोखणार ? सेतू कार्यालयात ३३.५० रुपये दर असताना देखील विद्यार्थ्यानाकडून यापेक्षा ही जास्त रुपये घेण्यात येते, ५० पैसे चलनात नसतानाही असे दर लावून एकप्रकारे महसूल विभागाकडून भ्रष्टाचार सुरु आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार, देशात दर १००० लोकसंख्येमागे केवळ १.३ रूग्णालये बेड आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक लोकशाही अपेक्षित होती. लोकशाही पुरस्कृत अशी समाजरचना बाबासाहेबांना अपेक्षित आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र, समता व बंधुता ही जीवनाची मूलभूत तत्त्वे स्वीकार करणारी पद्धती. पण, सध्या देशात धार्मिक लोकशाहीचे जे काही अवडंबर प्रतिगामी लोकांकडून माजले आहे ते दूर होणे आवश्यक आहे. असे अमोल वेटम म्हणाले.

Amol vetam

(अमोल वेटम हे रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख आहेत.)

संपर्क- मो ९७६५३२६७३२


Tags: Amol VetamFlag HoistingMaharashtraUNअमोल वेटममहाराष्ट्रयुएन
Previous Post

सावधान! घराणेशाह्या म्हणजे लोकशाहीला लागलेली कीडच! – विनोद देशमुख

Next Post

पंजाबात आता एक आमदार-एक निवृत्ती वेतन! जनतेच्या १०० कोटींची उधळपट्टी थांबणार!!

Next Post
Bhagwant Mann

पंजाबात आता एक आमदार-एक निवृत्ती वेतन! जनतेच्या १०० कोटींची उधळपट्टी थांबणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!