Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या

भाजपा प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे आवाहन

January 3, 2023
in घडलं-बिघडलं
0
chitra wagh

मुक्तपीठ टीम

समाजस्वास्थ्यासाठी स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन करणे अयोग्य असल्यानेच उर्फी जावेद हिने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अंगप्रदर्शनाला विरोध करणे जरुरीचे आहे. अशा अंग प्रदर्शनातून आपण लेकी- बाळींपुढे कोणता आदर्श ठेवणार आहोत याचा विचार पक्षभेद विसरून सर्वांनी करावा. या विषयाचे राजकारण न करता सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी सावित्रीमाईंचे संस्कार आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.

चित्रा वाघ यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की उर्फी जावेद हिने कोणता पेहराव करावा काय बोलावे याला माझा मुळीच आक्षेप नाही. माझा विरोध सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अंगप्रदर्शन करण्याला आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथे अशा पद्धतीने शरीराचे हिडीस प्रदर्शन करणे योग्य आहे का? आपल्या घरातल्या लेकी बाळींपुढे अशा विकृतीचा आदर्श ठेवायचा का ? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हा विषय राजकारणापलीकडचा आहे हे उर्फीचे समर्थन करणाऱ्यांनी लक्षात घेऊन माझ्या भूमिकेवर टीका करावी.

सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. पेहरावाचे भान  सवंग प्रसिद्धीसाठी राखले  जात नसेल तर त्याला नंगट मानसिकताच म्हटले पाहिजे. महिला सक्षमीकरणाचा जागर करताना स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून बाजार मांडला जाऊ नये. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली असा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही असेही चित्रा वाघ यांनी या पत्रकात नमूद केले आहे.


Tags: BJPchitra waghmumbaiUrfi Javedउर्फी जावेदभाजपा
Previous Post

मुंबईतील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – पालकमंत्री दीपक केसरकर

Next Post

महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची किड असल्याचा आरोप

Next Post
Hon.Min deepak kesarkar press at Mantralaya-1

महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची किड असल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!