Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता नवीन पॉवर बँक…मोबाइलप्रमाणेच लॅपटॉप कुठेही चार्ज

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
lenovo go

मुक्तपीठ टीम

लेनोव्होने आपला नवीन ब्रँड लेनोव्हो गो बाजारात आणला आहे. नवीन गॅजेट तयार करण्यासाठी कंपनीने नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. या नवीन गॅजेटमुळे ऑफिसमधून काम करणे आणि घरून काम करणे यामधील अंतर संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी कंपनीने लेनोव्हो गो यूएसबी-सी लॅपटॉप पॉवर बँक आणि लेनोव्हो गो वायरलेस मल्टी-डिव्हाइस माऊस बाजारात आणला आहे. लेनोव्होने म्हटले आहे की, ते लवकरच आणखी उपकरणे बाजारात आणतील.

लेनोवोच्या ग्लोबल एसएमबी, व्हिज्युअल अँड अॅक्सेसरीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष एरिक यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लेनोव्होच्या सर्वेक्षणात २०% छोट्या व्यवसायातील कर्मचार्‍यांकडे रिमोट मोडवर सहजपणे ऑपरेट करण्यासाठी तंत्रज्ञानाची साधने नसतात. आजच्या रिमोट आणि हायब्रिड वर्क कल्चरमध्ये डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसी असणारे तंत्रज्ञान असणे फार महत्वाचे आहे, जे कर्मचार्‍यांची उत्पादकता सुधारेल”.

छोट्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांची मोठी गरज ओळखून लेनोव्हो गो ते मार्केट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे कळते. लेनोव्हो हे दोन्ही डिव्हाइस या वर्षी जूनमध्ये लॉन्च करू शकतो. कंपनीच्या या विशेष पॉवर बँकेची किंमत ६,५८९ रुपये आहे. तर माऊसची किंमत ४,३९२ रुपये आहे.

‘लनोव्हो गो’ची पॉवर बँक आणि चार्जर

• लेनोव्होच्या लॅपटॉप पॉवरबँकमध्ये २०,००० एमएएच क्षमतेसह पोर्टेबल यूएसबी-सी बॅटरी आहे.
• ६५ डब्ल्यू आउटपुटसह असणारा हा चार्जर बहुतेक सर्व लॅपटॉप चार्ज करू शकतो.
• यामध्ये लॅपटॉप यूएसबी टाइप-सीद्वारे चार्ज होतो.
• हे डिव्हाइस लॅनोव्होने लॅपटॉप चार्ज करण्यासाठी डिझाइन केले आहे.
• विशेष म्हणजे याद्वारे एकाच वेळी तीन उपकरणे चार्ज केली जाऊ शकतात.
• यावेळी यूएसबी टाइप-ए पोर्टला केवळ १८ डब्ल्यू आऊटपुट मिळेल.
• या डिव्हाइसचे एकूण वजन ३९० ग्रॅम आहे, त्यामुळे ते कोठेही सहजपणे घेऊन जाता येते.

‘लेनोव्हो गो’ वायरलेस मल्टी-डिव्हाइस माउसचे वैशिष्ट्य

• लेनेव्हो गो वायरलेस मल्टी-डिव्हाइस माउस, तीन डिव्हाइससह जोडले जाऊ शकतो.
• पुश बटणाच्या मदतीने स्विच करता येतो.
• वायरलेस डोंगलदेखील देण्यात आला आहे, ज्याद्वारे वापरकर्ते कनेक्ट होऊ शकतात.
• हे यूएसबी टाइप सी केबलशी देखील जोडले जाऊ शकते.


Tags: lenovo gomuktpeethpower bank
Previous Post

एकाच डोसमध्ये कोरोनापासून संरक्षण देणारी लस लवकरच भारतात

Next Post

चक्रीवादळासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चा

Next Post
cm meeting

चक्रीवादळासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!