Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षण हक्क कायद्यानुसार दाखला नसला तरीही प्रत्येकाला प्रवेश!

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची घोषणा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
varsha gaikwad

मुक्तपीठ टीम

विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका शाळेतून दुसऱ्या प्रवेश घेण्यासाठी लागणारा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज तशा शासन निर्णयाची घोषणा केली आहे.

 

शासन निर्णयात म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांना शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीमध्ये, आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याचेहीं निदर्शनास आले आहे.

 

केवळ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे हे अन्यायकारक तसेच शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारे आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र उशिरा दिले जात असेल व त्यामुळे प्रवेश नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना नवीन शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरूप प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्याचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मानावे, असे निर्णयात म्हटले आहे.

 

इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात प्रवेशाची मागणी करत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र नाही म्हणून प्रवेश नाकारू नये. त्यांना तात्पुरता प्रवेश देऊन माध्यमिक शाळा संहिता मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी, असंही या निर्णयात म्हटलं आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक व शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.


Tags: Education Minister Varsha Gaikwadशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी येवल्यात समता परिषदेचा रास्ता रोको

Next Post

“भूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी”: गुलाबराव पाटील

Next Post
gulabrao patil

"भूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी": गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!