मुक्तपीठ टीम
भारत सरकारच्या सर्व मंत्रालये, विभाग आणि यंत्रणांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांना एकत्र एका व्यासपीठावर आणण्यासाठी व त्यायोगे पारदर्शकता व जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक सामायिक पोर्टल (https://awards.gov.in) सरकारने विकसित केले आहे.
या पोर्टलमुळे भारत सरकारच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांसाठी प्रत्येक नागरिकाला अथवा संस्थेला कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे नामनिर्देशन सुलभतेने करता येणार आहे.
सध्या खालील पुरस्कारांसाठी नामनिर्देशन अथवा सूचनांची सुविधा उपलब्ध आहे :
- पद्म पुरस्कार – शेवटची तारीख १५/०९/२०२२
- वन व्यवस्थापनात सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख ३०/०९/२०२२
- राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२२ – शेवटची तारीख १५/०९/२०२२
- राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२- शेवटची तारीख १५/०९/२०२२
- वरिष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार ‘ वयोश्रेष्ठ सन्मान’ २०२२- शेवटची तारीख २०/०८/२०२२
- वैयक्तिक सर्वोत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२१- शेवटची तारीख २८/०८/२०२२
- वैयक्तिक सर्वोत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख २८/०८/२०२२
- दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थांसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२१- शेवटची तारीख २८/०८/२०२२
- दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थांसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख २८/०८/२०२२
- कंपनी सामाजिक उत्तरदायित्व (CSR ) साठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२ – शेवटची तारीख ३१/०८/२०२२
- नारीशक्ती पुरस्कार २०२३- शेवटची तारीख ३१/१०/२०२२
- सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२३ – शेवटची तारीख ३१/०८/२०२२
- अमली पदार्थ सेवन तसेच मद्यपान प्रतिबंधासाठी सर्वोत्तम कार्य करणाऱ्या संस्थांसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख २८/०८/२०२२
- जीवन रक्षा पदक – शेवटची तारीख ३०/०९/२०२२
- अधिक माहितीसाठी व नामनिर्देशन करण्यासाठी कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल ला (https://awards.gov.in) भेट द्या.