Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शॉर्ट व्हिडीओंसाठी नवे भारतीय माध्यम, दुबईत ‘जय भीम’ अॅपचा टिझर लाँच

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
अॅप

मुक्तपीठ टीम

अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतरही तरुणाईमधील शॉर्ट व्हिडीओ अॅपची क्रेझ काही कमी झालेली नाही. आपल्या मुंबईतील एका स्वदेशी कंपनीने जय भीम अॅप नावाचे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमधून तरुणांना लहान लहान व्हिडिओ बनवून त्यातून पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. दुबई येथील मिड डे इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड्समध्ये जय भीम अॅपचा टीझर लाँच करण्यात आला आहे. गिरीश वानखेडे यांनी या अॅपला लाँच केले. या शॉट व्हिडिओ अॅपच्या पहिल्या झलकीस उपस्थित लोकांनी पसंती दर्शवली. अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. अॅपचे सीईओ आणि मनोरंजन उद्योगातील तज्ज्ञ गिरीश वानखेडे म्हणाले की, “छोट्या शहरांतील तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. ती संधी हे अॅप देणार आहे.”

 

पैसे कमवण्याची नवी क्रिटटिव्ह संधी

  • जय भीम अॅपमध्ये लहान व्हिडिओ बनवुन ते प्रदर्शित करण्याचे नवे प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.
  • याद्वारे पैसे कमवण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
  • छोट्या शहरांतील तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही.
  • शॉट व्हिडिओ अॅप त्यांना एक व्यासपीठ प्रदान करेल. याद्वारे लोक त्यांच्या व्हिडिओंमधून कमाई देखील करू शकतात.
  • यातून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग त्यांना दिला जाईल.
  • तरुणांना आणि इतर वयोगटातील लोकांना अभिनय किंवा मनोरंजनाच्या इतर क्षेत्रात करिअर करण्यास मदत करेल.

 

अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर मौज, जोश, टकाटक आणि चिंगारी यांनी बाजारात प्रवेश केला. या व्यतिरिक्त अजूनही भविष्यात येणाऱ्या अनेक लघु व्हिडिओ अॅप्सकडून भरपूर अपेक्षा आहे. आता हे लघु व्हिडिओ अॅप्स बी आणि सी श्रेणीतील शहरांमधील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. याद्वारे ते आपले कौशल्य सर्वांसमोर आणून आपला ठसा उमटवत आहेत. जय भीम अॅप हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे. हे केवळ मनोरंजनासाठी नाही तर यातुन पैसे कमवणे देखील शक्य आहे.

 

जय भीम अॅपमागे उद्देश काय?

  • देशातील क्रिएटिव्ह प्रतिभेला वाव देणे.
  • तरुणाईला मनोरंजनातून पैसे कमविणे आणि त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन
  • भारतीय संस्कृती आणि समानतेला प्रोत्साहन
  • अधिकाधिक प्रतिभावान लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना जागरूक करणे.
  • जय भीम अॅपची बीटा आवृत्ती एका आठवड्यात काम करण्यास सुरुवात करणार आहे.
  • डिसेंबरच्या अखेरीस ते पूर्णपणे जागतिक स्तरावर लॉन्च होईल.

 

गिरीश वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जय भीम अॅपमध्ये इतर आंतरराष्ट्रीय शॉर्ट व्हिडीओ अॅप्सची सर्व वैशिष्ट्ये आहेत. अॅपमध्ये क्रिएटीव्हिटी आणि उद्योजकतेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्यात सामाजिक संदेशाचीही काळजी घेण्यात आली आहे. असा त्यांचा विश्वास आहे.

 

गिरीश म्हणाले की, नवीन पिढीची क्रिएटीव्हीटी एका व्यासपीठावर आणणे हा त्यांचा उद्देश आहे. अशाप्रकारे हे एक दुवा म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांची प्रतिभा चांगल्या आणि क्रिएटिव्ह स्वरूपात बाहेर आणण्यासाठी प्रेरित करेल. गलादरी ब्रदर्सच्या सुहेल गालादारी सोबत, बॉलिवुड स्टार्स विवेक ओबेरॉय, नेहा शर्मा, अदिती राय हैदरी, जरीन खान, संदिपा धर, डेझी शाह आणि डॉ. बु अब्दुल्लाही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: DubaiIndiajai bhim appmuktpeethmumbai companyshort videosyouthजय भीम अॅपदुबईभारतमुक्तपीठ
Previous Post

आदिशक्तीच्या उत्सवात प्रथमच स्त्रीशक्तीला सार्वजनिक दुर्गा पूजेचा सन्मान

Next Post

मुंबई शेअर बाजारातून चांगली बातमी, ३५०व्या लघु-मध्यम उद्योगाचे लिस्टींग

Next Post
शेअर्स

मुंबई शेअर बाजारातून चांगली बातमी, ३५०व्या लघु-मध्यम उद्योगाचे लिस्टींग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!