मुक्तपीठ टीम
अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतरही तरुणाईमधील शॉर्ट व्हिडीओ अॅपची क्रेझ काही कमी झालेली नाही. आपल्या मुंबईतील एका स्वदेशी कंपनीने जय भीम अॅप नावाचे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमधून तरुणांना लहान लहान व्हिडिओ बनवून त्यातून पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. दुबई येथील मिड डे इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड्समध्ये जय भीम अॅपचा टीझर लाँच करण्यात आला आहे. गिरीश वानखेडे यांनी या अॅपला लाँच केले. या शॉट व्हिडिओ अॅपच्या पहिल्या झलकीस उपस्थित लोकांनी पसंती दर्शवली. अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. अॅपचे सीईओ आणि मनोरंजन उद्योगातील तज्ज्ञ गिरीश वानखेडे म्हणाले की, “छोट्या शहरांतील तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. ती संधी हे अॅप देणार आहे.”
पैसे कमवण्याची नवी क्रिटटिव्ह संधी
- जय भीम अॅपमध्ये लहान व्हिडिओ बनवुन ते प्रदर्शित करण्याचे नवे प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.
- याद्वारे पैसे कमवण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
- छोट्या शहरांतील तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही.
- शॉट व्हिडिओ अॅप त्यांना एक व्यासपीठ प्रदान करेल. याद्वारे लोक त्यांच्या व्हिडिओंमधून कमाई देखील करू शकतात.
- यातून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग त्यांना दिला जाईल.
- तरुणांना आणि इतर वयोगटातील लोकांना अभिनय किंवा मनोरंजनाच्या इतर क्षेत्रात करिअर करण्यास मदत करेल.
अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर मौज, जोश, टकाटक आणि चिंगारी यांनी बाजारात प्रवेश केला. या व्यतिरिक्त अजूनही भविष्यात येणाऱ्या अनेक लघु व्हिडिओ अॅप्सकडून भरपूर अपेक्षा आहे. आता हे लघु व्हिडिओ अॅप्स बी आणि सी श्रेणीतील शहरांमधील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. याद्वारे ते आपले कौशल्य सर्वांसमोर आणून आपला ठसा उमटवत आहेत. जय भीम अॅप हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे. हे केवळ मनोरंजनासाठी नाही तर यातुन पैसे कमवणे देखील शक्य आहे.
जय भीम अॅपमागे उद्देश काय?
- देशातील क्रिएटिव्ह प्रतिभेला वाव देणे.
- तरुणाईला मनोरंजनातून पैसे कमविणे आणि त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन
- भारतीय संस्कृती आणि समानतेला प्रोत्साहन
- अधिकाधिक प्रतिभावान लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना जागरूक करणे.
- जय भीम अॅपची बीटा आवृत्ती एका आठवड्यात काम करण्यास सुरुवात करणार आहे.
- डिसेंबरच्या अखेरीस ते पूर्णपणे जागतिक स्तरावर लॉन्च होईल.
गिरीश वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जय भीम अॅपमध्ये इतर आंतरराष्ट्रीय शॉर्ट व्हिडीओ अॅप्सची सर्व वैशिष्ट्ये आहेत. अॅपमध्ये क्रिएटीव्हिटी आणि उद्योजकतेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्यात सामाजिक संदेशाचीही काळजी घेण्यात आली आहे. असा त्यांचा विश्वास आहे.
गिरीश म्हणाले की, नवीन पिढीची क्रिएटीव्हीटी एका व्यासपीठावर आणणे हा त्यांचा उद्देश आहे. अशाप्रकारे हे एक दुवा म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांची प्रतिभा चांगल्या आणि क्रिएटिव्ह स्वरूपात बाहेर आणण्यासाठी प्रेरित करेल. गलादरी ब्रदर्सच्या सुहेल गालादारी सोबत, बॉलिवुड स्टार्स विवेक ओबेरॉय, नेहा शर्मा, अदिती राय हैदरी, जरीन खान, संदिपा धर, डेझी शाह आणि डॉ. बु अब्दुल्लाही या कार्यक्रमाला उपस्थित होते.