Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टपाल कर्मचाऱ्यांच्या ‘कधीही, कुठेही’ प्रशिक्षणासाठी ‘डाक कर्मयोगी’ ई-लर्निंग प्लॅटफॉर्म

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
डाक कर्मयोगी

मुक्तपीठ टीम

‘डाक कर्मयोगी’ या टपाल विभागाच्या ई-लर्निंग पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय दळणवळण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आणि केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीच्या इंडियन हॅबिटॅट सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. ‘डाक कर्मयोगी’ पोर्टल सुमारे 4 लाख ग्रामीण डाक सेवक आणि विभागीय कर्मचार्‍यांची क्षमता वाढवण्या प्रशिक्षणाची सुविधा पुरवेल. तसेच प्रशिक्षणार्थींना एकसमान प्रमाणित प्रशिक्षण सामग्री ऑनलाइन किंवा मिश्रित पध्दतीने प्रत्यक्षपणे प्रवेश करण्यास सक्षम बनवणार आहे.

हे पोर्टल टपाल कर्मचाऱ्यांना ग्राहकांना विविध प्रकारच्या शासन ते ग्राहक (G2C) सेवा प्रभावीपणे वितरित करण्यास सक्षम करेल.नेमून दिलेले कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर, प्रशिक्षणार्थीच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर स्वयंचलित प्रणालीद्वारे तयार केलेले अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पाठवले जाईल. प्रशिक्षणार्थी प्रत्येक व्हिडिओ आणि इतर शिक्षण सामग्रीसाठी त्यांचा अभिप्राय, श्रेणी आणि सूचना देऊ शकतात जेणेकरुन आवश्यक सुधारणा करणे सुनिश्चित करता येईल.

‘कधीही, कुठेही’ प्रशिक्षण

या पोर्टलला सुरुवात झाल्यामुळे, विभागीय कर्मचारी आणि ग्रामीण डाक सेवक त्यांच्या सोयीनुसार ‘कधीही, कुठेही’ प्रशिक्षण घेऊ शकतील आणि त्यांची वृत्ती, कौशल्य आणि ज्ञान (A,S,K)यांच्या श्रेणीत सुधारणा करू शकतील.कर्मचारी आणि ग्रामीण डाक सेवकांची श्रेणीसुधारित करून उत्तम सेवा प्रदान करण्यात त्यांना सक्षम करण्यासाठी पोर्टल मधे येत्या काही काळात अनेक सुधारणा होत जातील,अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि किमान सरकार’ आणि ‘कमाल प्रशासन’ या संकल्पनेसह नोकरशाहीच्या कार्यक्षमतेमध्ये ‘उचित परिवर्तन’ आणण्याच्या उद्देशाने आणलेल्या ‘मिशन कर्मयोगी’ चा दृष्टीकोन समोर ठेवून हे पोर्टल टपाल खात्यांतर्गत ‘इन-हाउस’ विकसित केले गेले आहे.

टपाल खात्यातील कर्मचार्‍यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या कामाचा दर्जा टिकवणे किंवा सुधारणे यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी, अश्विनी वैष्णव, आणि देवूसिंह चौहान यांच्या हस्ते आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्मचाऱ्यांना मेघदूत पुरस्कार या कार्यक्रमादरम्यान प्रदान करण्यात आले.

पुरस्कार विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र आणि रोख २१ हजार रूपये प्रदान करण्यात आले.

पाहा व्हिडीओ:


Tags: e-learning platformElectronics and Information Technology Minister Ashwini Vaishnavgood newsmuktpeethPostal Departmentpostal stafftrainingइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानई-लर्निंग प्लॅटफॉर्मउपयोगी बातमीचांगली बातमीटपाल कर्मचारीटपाल विभागडाक कर्मयोगीप्रशिक्षणमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्राची हरित ऊर्जा क्षेत्रात भरारी, ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार

Next Post

भारतीय प्रादेशिक सेनेत ‘प्रादेशिक सेना अधिकारी’ पदाच्या १३ जागांवर भरती

Next Post
Indian Territorial Army

भारतीय प्रादेशिक सेनेत 'प्रादेशिक सेना अधिकारी' पदाच्या १३ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!