Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिजाब X भगवा…लढणाऱ्यांसाठी काश्मिरमध्ये शहीद जवानाचा अखेरचा संदेश! नक्की वाचावा असा…

February 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
hijab (2)

मुक्तपीठ टीम

कर्नाटकमध्ये हिजाब वादावरून देशाचे वातावरण तापले आहे. कर्नाटकातील सरकारी महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना वर्गात बसण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी सरकारचा निषेध केला. त्याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भगवे उपरणे घालत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. हा वाद सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात सुरु आहे. मात्र या वादावरून एक व्हाईस मेसेज सध्या व्हायरल होतोय. “हिजाब आणि भगवा यावरून भांडू नका. जेव्हा आम्ही अशा गोष्टी पाहतो तेव्हा आम्हाला वाईट वाटते,” काश्मीर हिमस्खलनात शहीद झालेले हवालदार अल्ताफ अहमद यांचा हा अखेरचा मोलाचा संदेश आहे.

 

शहीद जवानाचा अखेरचा संदेश!

आपला जीव गमावण्यापूर्वी ३७ वर्षीय अल्ताफ यांच्या मोबाईलवरील हा शेवटचा व्हॉईस मेसेज त्यांच्या सहकारी सैनिकांनी शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केला. शेअर केलेल्या व्हॉईस मेसेजमध्ये अल्ताफ यांनी देशवासीयांना मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन केले आहे. अल्ताफ म्हणतात की, “चांगले रहा. धर्म आणि जातीच्या नावावर भांडू नका. आमचे सैनिक येथे (काश्मीर) सेवा करताना आपले प्राण पणाला लावतात, जेणेकरून तुम्ही स्वस्थ आणि सुरक्षित रहा. राष्ट्राचा विचार करा आणि तुमच्या मुलांनाही ते करायला शिकवा.”

 

अल्ताफ पुढे म्हणाले की, “हिजाब आणि भगव्यावरुन भांडू नका. अशा गोष्टी पाहिल्यावर आम्हाला वाईट वाटते. येथे आपले कर्तव्य बजावत असताना देशातील जनता चांगली आहे, असे मानतो. तसेच आपण सर्व भारतमातेची मुलं आहोत यावर विश्वास ठेवा. कृपया आमचे बलिदान वाया घालवू नका. जेव्हा आम्ही अशा गोष्टींबद्दल (हिजाब विवाद) ऐकतो तेव्हा आम्हाला वाईट वाटते, कारण सीमेवर आमच्या डोळ्यांसमोर अनेक लोक आपल्या प्राणांची आहुती देतात.”

 

अल्ताफ यांचा परिचय-

  • आर्मी ऑर्डनन्स कोअरचा भाग असलेले कोडागुचे रहिवासी अल्ताफ काश्मीरमध्ये तैनात होते.
  • त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
  • अल्ताफ यांची पत्नी जुबेरी १० वर्षांपासून केरळमधील मत्तनूर जिल्ह्यात राहत आहे.
  • ती मूळची विराजपेठेतील यडपाळ येथील आहे.
  • मीनुपेटे येथे वाढलेल्या अल्ताफ यांनी विराजपेठेतील सेंट अॅन्स स्कूलमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
  • त्यानंतर विराजपेठ शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.
  • त्यानंतर, आर्मी ऑर्डनन्स कोअरमध्ये रेजिमेंटमध्ये सामील झाले.
  • त्यात ते १९ वर्षे काम करत होते.

Tags: Altaf AhmaidHijabkarnatakaअल्ताफ अहमदकर्नाटक उच्च न्यायालयशहीद जवानहिजाब वाद
Previous Post

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत पदवीधर आणि टेक्निशियन पदावर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

नवाब मलिक घाबरणार नाहीत, ओढून ताणून दाऊदशी उगाचच जोडण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

Next Post
jayant patil on nawab malik

नवाब मलिक घाबरणार नाहीत, ओढून ताणून दाऊदशी उगाचच जोडण्याचा प्रयत्न! - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!