Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिक घाबरणार नाहीत, ओढून ताणून दाऊदशी उगाचच जोडण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jayant patil on nawab malik

मुक्तपीठ टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करत आहेत. या अटकेवरून महाविकास आघाडी आणि भाजपा पुन्हा आमनेसामने आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर काही गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांचा ओढून ताणून दाऊदशी संबंध जोडले जात आहेत. पण त्यात अजिबात तथ्य नाही असा दावा करत नवाब मलिक घाबरणारे नेते नाहीत, असे जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे.

 

जयंत पाटलांचे ईडीला प्रश्न

  • मुख्यत्यारपत्र घेतलेले सलीम पटेल यांच्याशी २००५ मध्ये जमीनीचा व्यवहार नवाब मलिक यांनी केला असताना त्यांचा दाऊदशी संबंध पोचवण्याचे प्रयत्न सुरू आहे, यात तथ्य नाही, ओढूनताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत.
  • ज्या जमिनीचा संबंध जोडला जात आहे त्या जमीनीचा व्यवहार करताना रितसर स्टॅम्पड्युटी भरली गेली.
  • २००५ मध्ये व्यवहार झाला आणि २००७ मध्ये सलीम पटेल बॉम्बस्फोटात आरोपी होता.
  • मग त्या व्यवहाराशी कसा संबंध जोडता? त्या जमीनीच्या हरकतीबाबत २०१८ मध्ये जाहिरात देण्यात आली होती.
  • त्यावेळी मुनिरा प्लंबर यांनी कोणतीही हरकत घेतली नाही मात्र २० वर्षानंतर जमीन खरेदीतील पैसे मिळाले नाही म्हणणे कितपत योग्य आहे असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारला आहे.

 

हा सगळा प्रकार ओढून ताणून केलाय…

  • नवाब मलिक यांनी सलीम पटेल यांना मुखत्यारपत्रानुसार पैसे दिल्यावर सलीम पटेल याने मुनिरा प्लंबर यांना पैसे दिले नाही.
  • यामध्ये नवाब मलिक यांचा काय दोष याला जबाबदार सलीम पटेल आहे.
  • त्याच्यावर कारवाई करायला हवी.
  • मुनिरा प्लंबर यांनी आरोप केल्यानंतर ओढून ताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करुन अडकवण्यात आले आहे.
  • हा सगळा प्रकार ओढून ताणून केला आहे.
  • हे धक्कादायक आहे.
  • नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध नाही.
  • नवाब मलिक हे अनेक वर्ष पक्षात काम करत आहेत.
  • त्यांचा संबंध जोडणे ही निषेधार्ह बाब आहे.
  • राज्यातील जनताही या घटनेचा निषेध करतेय.

 

मलिक खाबरणारे नेते नाहीत…

  • समन्स नसताना अटक करणे योग्य नाही.
  • नवाब मलिक घाबरणारे नेते नाहीत.
  • ईडीला जर माहिती हवी होती तर त्यांनी दिली असती परंतु तसे न करता एका मंत्र्यांला अशा पध्दतीने घरातून उचलून आणणे योग्य नाही.
  • नवाब मलिक यांची बाजू देशासमोर, राज्यासमोर यावी म्हणून यासंदर्भातील माहिती देत असून अधिक मुद्दे वकील मांडतील.

Tags: BJPjayant patilMaharashtraNawab MalikNCPजंयत पाटीलनवाब मलिकभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

हिजाब X भगवा…लढणाऱ्यांसाठी काश्मिरमध्ये शहीद जवानाचा अखेरचा संदेश! नक्की वाचावा असा…

Next Post

किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांना अटकेची भीती? अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

Next Post
neil somaiya

किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांना अटकेची भीती? अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!