Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चार वर्षात १७० आमदारांनी सोडला काँग्रेसचा हात, भाजपाच्या १८!

March 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp and congress

मुक्तपीठ टीम

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात २०१६ ते २०२० मध्ये निवडणुकांच्यावेळी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या आयाराम-गयारामांची आकडेवारी सादर केली आहे. अहवालानुसार काँग्रेसच्या १७० आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केला. तर भाजपाच्या फक्त १८ आमदारांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतला.

एडीआर अहवालानुसार कोण गेले कुठे?

• २०१६ ते २०२० मध्ये पक्ष बदलून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता
• २८ आमदारांनी काँग्रेसचा हात हाती घेतला.
• २५ आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीला आपलं मानलं.
• २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही पाच लोकसभा सदस्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.
• २०१६ ते २०२० मध्ये काँग्रेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.
• २०१६ ते २०२० दरम्यान पक्ष बदलून पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या १६ राज्यसभेतील सदस्यांपैकी १० जणांनी भाजपावासी झालेत.
सातत्याने गळती होत आहे तरीही काँग्रेस सावध होत आहे असे दिसत नाही. आजही पक्षांतर्गत नाराजी वाढतीच आहे. काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी, जी २३ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. केरळमधील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले गेलेले पीसी चाको यांनीही बुधवारी पक्ष सोडला. त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षांना पाठवला होता.

 

या ज्येष्ठ नेत्यांना समजवून सोबत ठेवण्यासाठी काँग्रेसकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाही. काँग्रेसने पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जारी केली. या यादीत अपवाद वगळता जी-२३ च्या नेत्यांपैकी कुणाचेही नाव नाही.


Tags: BJPCongressकाँग्रेसभाजपामोदी सरकार
Previous Post

कंगना रानौतवर काश्मिरी लेखकाची कथा चोरल्याचा गुन्हा

Next Post

कर्नाळा बँक घोटाळ्याची आता दिल्लीतही चर्चा

Next Post
karnala bank

कर्नाळा बँक घोटाळ्याची आता दिल्लीतही चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!