Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दरडी कोसळल्यानं महाराष्ट्रात मृत्यूचं थैमान

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
landslides

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. दरड दुर्घटनेतील बळींची संख्या ८९ वर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

पोलादपूर

  • पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची येथे दरड कोसळली आहे.
  • या दरडीखाली काही रहिवासी अडकल्याची शक्यता आहे.
  • पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत.
  • आतापर्यंत यामध्ये दरडीखाली ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • १३ जखमींवर उपचार सुरु आहेत.

 

महाड

  • महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

सिंधुदुर्ग

  • कणकवली दिगवळे येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे.
  • सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गा असलेला आंबोली मुख्य धबधब्याजवळ दरड व माती कोसळली.
  • त्यामुळे वाहतुकीस रस्ता ठप्प झाला.
  • दरड कोसळल्याने सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता.
  • आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा दरड कोसळली.
  • आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झाला.
  • जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच याची तात्काळ दखल घेऊन दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.

 

सातारा

  • साताऱ्यातील पाटण, जावळी, वाई तालुक्यांमध्ये दरड कोसळून एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • पाटण तालुक्यातील ढोकावळे येथे दरड कोसळल्यामुळे चार लोक मृत्युमुखी पडले आहेत.
  • साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला.
  • वाई तालुक्यातील देवरूखवाडी येथे भूस्खलन झाल्याने ७ ते ८ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती.
  • यामध्ये २७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
  • या दुर्घटनेत ४ जण बेपत्ता झाले होते.

 

चिपळूण

  • चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे १७ जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  • त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळली आहे.
  • यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे.
    खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून २ जणांचा मृत्यू झाला आहे..

 

पन्हाळा

  • पन्हाळा बाजारपेठ रस्ता भुस्खलनाने खचल्यामुळे पन्हाळ्यावर येण्याचा मार्गही बंद झाला आहे.
  • भूस्खलनामुळे वीजेच्या खांबासह व सार्वजनिक बांधकाम खात्याने अलिकडच्या काळात बांधलेल्या कठड्यासह निम्मा रस्ता खचल्याने गडावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झाला आहे.

Tags: LandslideMaharashtraमहाराष्ट्र
Previous Post

“डोंगरउतारांवरील गावे व वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी सहकार्य करावे!”

Next Post

पावसानं झोडलेल्या पाच जिल्ह्यांमधील कोरोनाचा कहर तसाच! राज्याच्या रुग्णसंख्येच्या एक तृतीयांश रुग्ण!

Next Post
MCR 1-5-21

पावसानं झोडलेल्या पाच जिल्ह्यांमधील कोरोनाचा कहर तसाच! राज्याच्या रुग्णसंख्येच्या एक तृतीयांश रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!