मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. दरड दुर्घटनेतील बळींची संख्या ८९ वर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
पोलादपूर
- पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची येथे दरड कोसळली आहे.
- या दरडीखाली काही रहिवासी अडकल्याची शक्यता आहे.
- पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत.
- आतापर्यंत यामध्ये दरडीखाली ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
- १३ जखमींवर उपचार सुरु आहेत.
महाड
- महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग
- कणकवली दिगवळे येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे.
- सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गा असलेला आंबोली मुख्य धबधब्याजवळ दरड व माती कोसळली.
- त्यामुळे वाहतुकीस रस्ता ठप्प झाला.
- दरड कोसळल्याने सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता.
- आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा दरड कोसळली.
- आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी ठप्प झाला.
- जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच याची तात्काळ दखल घेऊन दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.
सातारा
- साताऱ्यातील पाटण, जावळी, वाई तालुक्यांमध्ये दरड कोसळून एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
- पाटण तालुक्यातील ढोकावळे येथे दरड कोसळल्यामुळे चार लोक मृत्युमुखी पडले आहेत.
- साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला.
- वाई तालुक्यातील देवरूखवाडी येथे भूस्खलन झाल्याने ७ ते ८ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती.
- यामध्ये २७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
- या दुर्घटनेत ४ जण बेपत्ता झाले होते.
चिपळूण
- चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे १७ जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळली आहे.
- यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे.
खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून २ जणांचा मृत्यू झाला आहे..
पन्हाळा
- पन्हाळा बाजारपेठ रस्ता भुस्खलनाने खचल्यामुळे पन्हाळ्यावर येण्याचा मार्गही बंद झाला आहे.
- भूस्खलनामुळे वीजेच्या खांबासह व सार्वजनिक बांधकाम खात्याने अलिकडच्या काळात बांधलेल्या कठड्यासह निम्मा रस्ता खचल्याने गडावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झाला आहे.