Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमात कसे सहभागी होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
marathi language day

मुक्तपीठ टीम

 

‘मराठी भाषा गौरव दिन’ व  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी  वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन साहित्य रसिकांना करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीतून राज्यशासनाच्या प्रसिध्दी विषयक कामांसह मराठी भाषा व महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शविणारे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राची खास ओळख आहे. वि.वा.शिरवाडकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत परिचय केंद्राने त्यांच्या कविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी भाषा अवगत असणा-या सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून कुसुमाग्रजांच्या कविता पुन्हा जनतेपर्यंत पोहचाव्यात या उद्देशाने परिचय केंद्राने हा उपक्रम सुरु केला आहे. उत्तम सादरीकरणास परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे प्रसिध्दी देण्यात येत आहे.

मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान  आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून  साजरा करण्यात येतो.

कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा

वि.वा. शिरवाडकरांचे  एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंबऱ्या, १६ कथासंग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिद्ध आहे. १९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट  ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारही  मिळाला.

या कविता संग्रहातील कविता वाचनाचे आवाहन

कुसुमाग्रजांचे एकूण २४ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत ,जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ता-याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.

कुसुमाग्रजांच्या या २४ काव्यसंग्रहातील निवडक कविता व्हिडीओ स्वरूपात   कार्यालयास पाठवाव्यात. सुस्पष्टोच्चार व उत्तम सादरीकरण असणा-या कविता वाचनाची कार्यालयाच्या संपादन मंडळाकडून निवड झाल्यावर ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात येईल.

कसा घ्याल भाग?

कविता वाचणाऱ्या व्यक्तीने स्वत:चा अल्प परिचय, कुसुमाग्रजांची जी कविता वाचणार आहात त्या कवितेचे शिर्षक व कविता संग्रहाचे नाव याची थोडक्यात माहिती द्यावी. कार्यालयाच्यावतीने दि. १३ फेब्रुवारी पासून कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ प्रसारीत करण्यात येत आहेत हा उपक्रम २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत चालेल. व्हिडीओ निवडीचे संपूर्ण अधिकार कार्यालयाच्या संपादन मंडळाकडे असतील. तरी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ तयार करून ९८९९११४१३० आणि ९८७१७४२७६७ या व्हाट्सअप क्रमांकांवर रचना पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.


Tags: kusumagrajmarathimarathi language dayकुसुमाग्रजमराठीमराठी भाषा दिन
Previous Post

इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा ५ जून रोजी

Next Post

व्हॉट्सअॅपला सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले…लोकांचे खाजगी आयुष्य महत्वाचे!

Next Post
whatsapp privacy

व्हॉट्सअॅपला सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले...लोकांचे खाजगी आयुष्य महत्वाचे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!