Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुमार केतकर – दाखवण्यापुरता नसलेला अस्सल उदारमतवाद!

January 10, 2021
in प्रेरणा
0
Kumar Ketkar Dimond Jubilee

  • हेरंब कुलकर्णी

 

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस. टीम @muktpeeth तर्फे सरांना खूप खूप शुभेच्छा. पत्रकारितेतील या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अस्सल उदारमतवादावर सुप्रसिद्ध लेखक-कवी-शिक्षण अभ्यासक-कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख नक्की वाचा

 

शरद जोशी आणि कुमार केतकर एकमेकांत काही मतभेद होते. मी शरद जोशी अमृतमहोत्सवानिमित्त त्यांची मुलाखत घेऊन त्यांना पाठवली.मुलाखत खूप मोठी होती. खाजगीत त्यांनी दोघांतील नाते सांगितले पण त्यांनी त्यादिवशी वाचकांची पत्र रद्द करून खूप मोठी एकही वाक्य कट न करता लोकसत्तात संपूर्ण छापली. हा उदारमतवाद केतकरांनी शिकवला. त्यांच्यावर टीका करणारी पत्र अगोदर घेत जा, असे ते स्पष्ट सांगत असत.

 

त्यांच्या एका भाषणाचे निमंत्रण संयोजक स्थानिक सहकार सम्राटांनी स्थानिक प्रतिनिधीला दिले नाही. तो प्रतिनिधी भेटायला आला. पण म्हणाला की मी बातमी पाठवणार नाही, कारण मला निमंत्रण नाही. केतकरांनी परवानगी देऊन त्याचा आत्मसन्मान जपला. इतक्या मोकळेपणाने सामान्य प्रतिनिधीही त्यांच्याशी बोलू शकत होता. त्यांच्या मोठेपणाचे दडपण समोरच्यावर येत नाही हे वेगळेपण!

 


जे. कृष्णमूर्ती हा आमचा दोघांतील धागा. त्यांच्यावर त्यांनी लेख लिहीला. ती पुरवणी ग्रामीण अंकात येत नव्हती. त्यांनी पोस्टाने तो अंक पाठवला. महाराष्ट्र टाइम्स सोडल्यावर ते भंडारदरा येथे आले होते. ती पहिली भेट. त्यानंतर मी त्यांना पत्र लिहीले व त्यात तुम्ही कुठेतरी असायला हवे असे लिहीले. तेव्हा लोकमतची ऑफर होती. त्यांनी मला फोन केला व म्हणाले माझा निर्णय होत नव्हता, तुझे मनापासून लिहिलेले पत्र वाचले आणि द्विधा संपली…लगेच दर्डांना होकार कळवला.

एका वाचकाच्या भावनेशी इतके एकरूप असणारे केतकर आहेत. त्यांच्या मतांशी असहमत असा किंवा सहमत, पण त्यांना ओलांडून जाता येत नाही. आमची लोहिया-जयप्रकाश भक्ती व घराणेशाहीविरोध त्याना माहीत असूनही ते खुलेपणाने बोलत.
माझ्यासारख्या ग्रामीण भागातील अनेकांना त्यांनी मोठ्या वृत्तपत्रात स्थान दिले त्यातून लेखनप्रवास सुरु झाला. माझ्या पहिल्या कविता संग्रहाला त्यांची प्रस्तावना आहे. तर ‘कृष्णमूर्ती’ पुस्तकाचे प्रकाशन करायला ते आवर्जून पुण्यात आले.
असे हे अमृतमहोत्सवी केतकर!

(शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते असणारे हेरंब कुलकर्णी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या थेट जाणून घेतात, अनुभवतात आणि सोप्या शब्दांमध्ये मांडतात. त्याबरोबरच त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व काव्यक्षेत्रातही प्रसिद्ध आहे.)


Tags: CongressHeramb Kulkarnikumar ketkarMarathi Journalist KetkarMP Kumar ketkarकाँग्रेस खासदार कुमार केतकरकुमार केतकरकुमार केतकर अमृतमहोत्सवपत्रकार कुमार केतकरमराठी पत्रकार कुमार केतकर
Previous Post

आजचा दिवस गेल्या २५ महिन्यातील सर्वात महाग दिवस!

Next Post

सोनू सुदला धडा शिकवण्यासाठी राज्य सरकारची सूड भावनेनं कारवाई – राम कदम

Next Post
Ram kadam

सोनू सुदला धडा शिकवण्यासाठी राज्य सरकारची सूड भावनेनं कारवाई - राम कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!