Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्रातील ६०पेक्षा जास्त गुणवंत UPSC परीक्षेत यशस्वी! जाणून घ्या कोणत्या सेवेत होणार नियुक्ती…

May 31, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं
0
UPSC

मुक्तपीठ टीम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी १३ व्या आणि ४४ व्या क्रमांकावर आहेत. जाणून घ्या या गुणवंतांची नियुक्ती कोणत्या सरकारी सेवेत होण्याची शक्यता आहे…

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२१ च्या परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील ५ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रियंवदा म्हडाळकर (१३) अंजली श्रोत्रीय (४४), श्रध्दा गोमे (६०), शुभम अशोक भैसारे (९७), अंकित हिरडे (९८),आदित्य काकडे (१२९),शुभम भोसले (१४९),विनय कुमार गाडगे (१५१), ओंकार पवार (१९४), रामेश्वर सब्बनवाड (२०२), अक्षय वाखरे (२०३), अक्षय महाडिक (२१२), तन्मयी देसाई (२२४), अभिजीत पाटील (२२६), तन्मय काळे, (२३०), विशाल खत्री (२३६), संचित गुप्ता (२३७), उत्कर्ष खंडाळ (२४३), मृदुल शिवहारे (२४७), इशान टिपणीस (२४८), प्रतीक मंत्री (२५२), सुयश कुमार सिंग (२६२), सोहम मांढरे(२६७), अश्विन राठोड़ (२६५), अर्शद मोहम्मद (२७६), सागर काळे (२८०), रोहन कदम (२९५), रणजित यादव (३१५) गजानन बाळे (३१९), वैभव काजळे (३२५), अभिजीत पठारे (३३३), राहूल देशमुख (३४९), सुमित रामटेके (३५८), विनायक भोसले (३६६),आदित्य पटले (३७५), स्वप्न‍िल सिसळे (३९५),सायली म्हात्रे (३९८), हर्षल महाजन (४०८), शिवहर मोरे (४०९), चेतन पंढेरे (४१६), स्वप्न‍िल पवार (४१८), पंकज गुजर (४२३), अजिंक्य माने (४२४), ओंकार शिंदे (४३३), रोशन देशमुख (४५१), देवराज पाटील (४६२), अनिकेत कुलकर्णी (४९२), शिल्पा खानिकर (५०६), अस्मर धनविजय (५५८), नितीश डोमले(५५९), निरज पाटील (५६०), आकांक्षा तामगाडगे (५६२), आशिष पाटील (५६३), शुभम नगराळे (५६८), अमीत शिंदे (५७०), स्वप्न‍िल माने (५७८), प्रशांत डगळे (५८३), अभय सोनारकर (६२०), अश्विन गोलपकर (६२६), मानसी सोनवणे (६२७), अमोल आवटे (६७८), पुजा खेडकर (६७९).

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२२ महिण्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ६८५ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (खुला) गटातून –२४४, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ७३, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – २०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – १०५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ६० उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये २६ दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने १२६ उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- ६३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- २०, इतर मागास वर्ग -३६, अनुसूचित जाती- ०७, अनुसूचित जमाती – निरंक उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

  • भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -१८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ७२, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १८, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –४९, अनुसूचित जाती (एस.सी.) – २७, अनुसूचित जमाती (एस.टी.) – १४ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – ३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (खुला) – १४, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०४, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – १०, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) – ०३ जागा रिक्त आहेत.
  • भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (खुला) – ८३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – ५१, अनुसूचित जाती प्रवर्गातून – २६, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – २० उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
  • केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – २४२ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) – १०३, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) २३, इतर मागास प्रवर्गातून – ६८, अनुसूचित जाती प्रवर्गातून – ३१ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –१७ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.
  • केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – ९० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) – ३६, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०८ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – २५, अनुसूचित जाती प्रवर्गातून – १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ०६ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

८० उमेदवारांची निवड तात्पुरती असेल…

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


Tags: MaharashtraUPSCकेंद्रीय लोकसेवा आयोगमहाराष्ट्र
Previous Post

विज्ञान क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती

Next Post

सातारचा युवा फुटबाॅलर आशिया कप गाजवणार!

Next Post
सातारचा युवा फुटबाॅलर आशिया कप गाजवणार!

सातारचा युवा फुटबाॅलर आशिया कप गाजवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!