मुक्तपीठ टीम
प्रत्येकाचेच विदेशात फिरण्याचे एक स्वप्न असते. काहीजण हे स्वप्न पूर्णही करतात तर, काहींना आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट पाहावी लागते. परंतु, आता काळजी करण्याची गरजच नाही. जगात असेही काही देश आहेत जे भारतापेक्षाही स्वस्त आणि पर्यटनासाठी मस्त आहेत. याविषयी जाणून घेण्यासाठी ही बातमी उपयोगी ठरणार आहे. भारताबाहेर कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर, अशा ठिकाणांबद्दल जाणून घ्या जिथे भारतीय चलनाची किंमत खूप जास्त आहे. या देशांमध्ये राहणे, खाणे, पिणे, वाहतूक, हॉटेल आणि इतर कामांचा खर्च कमी आहे.
आता नवीन वर्ष सुरू होत आहे, यामुळे पर्यटक देश-विदेशात हे क्षण उत्साहात साजरा करण्याचा विचार करत आहेत. काही पर्यटकांनी तर, यासाठी आधीच बुकिंगही केल्या आहेत. तुम्हीही या शहरांना भेट द्या जिथे आपण श्रीमंत असल्याचे भासते. आत्तापासूनच तिकीट बुक करा.
भारताबाहेरील आणि भारतापेक्षाही स्वस्त ठिकाणांची यादी!
१. पॅराग्वे
- पॅराग्वे जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे.
- पॅराग्वेचे चलन पराग्वे गुआरानी आहे, जे भारतीय चलन रुपयापेक्षा कमी आहे.
- या देशात राहणे, खाणे, पिणे, वाहतूक, हॉटेल आणि इतर गोष्टींचा खर्च कमी आहे.
- जर कमी खर्चिक परदेशी सहल करायची असेल तर परदेशात पॅराग्वेला जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
- पराग्वे पॅराग्वेयन गुआरानीचे चलन भारतीय चलनाच्या एक रुपयाच्या तुलनेत ८८.४६ आहे.
२. कंबोडिया
- कंबोडिया हे पर्यटनासाठी स्वस्त आणि उत्तम ठिकाण आहे.
- कंबोडियामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. या देशात राहणे, खाणे, पिणे, वाहतूक, हॉटेल आणि इतर गोष्टींचा खर्च कमी आहे.
- जर नवीन वर्ष २०२३ मध्ये परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर कंबोडियाला भेट देऊ शकता.
- कंबोडियन रिएलचे मूल्य भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत ४९.८२ रिएल आहे.
३. व्हिएतनाम
- व्हिएतनाममध्ये नवीन वर्ष साजरे करणे हा एक संस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
- येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
- हे जगातील अशा देशांमध्ये समाविष्ट आहे, जेथे भारतीय चलन रुपयाचे मूल्य खूप जास्त आहे.
- त्यामुळे भारतीय पर्यटकांसाठी हा देश स्वस्त होतो.
- व्हिएतनाममध्ये भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये हो ची मिन्ह सिटी, फु क्वोक, डनांग, होई एन, हॅलोंग बे, दा नांग इत्यादींचा समावेश आहे.
- व्हिएतनाममधील चलन भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत २८५.५२ डॉंग रिएल आहे.
४. मंगोलिया
- मंगोलियाचे चलन भारतीय चलनापेक्षा स्वस्त आहे.
- हा देश चीन आणि रशियासारख्या राष्ट्रांनी वेढलेला आहे.
- हॉर्स राइड हा मंगोलियामध्ये पारंपारिकपणे एक जबरदस्त अनुभव आहे.
- मंगोलियामध्ये प्रवास आणि खरेदी स्वस्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल, तर मंगोलिया तुमच्यासाठी बजेट-फ्रेंडली आहे.
- मंगोलियामधील चलन भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत ४१.५ तुग्रीक आहे.
५. नेपाळ
- नेपाळ भारताचा शेजारी देश असण्यासोबतच तो चांगला मित्र देशही आहे.
- नेपाळमध्ये अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आहेत, जिथे तुम्ही कमी खर्चात प्रवास करू शकता.
- पशुपतीनाथ मंदिर, बुद्ध मंदिर, सिम्बुनाथ मंदिर इत्यादी ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
- भारतापेक्षा येथे गोष्टी स्वस्त आहेत, त्यामुळे तुम्ही खरेदीचा खूप आनंद घेऊ शकता.
- नेपाळमधील चलन भारतीय चलन १ रुपयाच्या तुलनेत १.६० नेपाळी रूपये आहे.