मुक्तपीठ टीम
टॅक्स सेव्हिंग एफडी हे बँक आणि एनबीएफसीद्वारे ऑफर केलेले एक आर्थिक गुंतवणूक साधन आहे जिथे तुम्ही पैसे जमा करू शकता आणि सामान्य बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. नियमित एफडी जास्त परतावा देऊ शकते परंतु कर लाभ देत नाही. टॅक्स सेव्हिंग एफडीत पाच वर्षांची लॉक-इन कालावधी आहे. याचा अर्थ असा की एकदा गुंतवणूकदाराने एफडीमध्ये गुंतवणूक केली की, तो पाच वर्षांनीच त्याचे पैसे काढू शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केल्याने, आयकर कलम ८०सी अंतर्गत एका आर्थिक वर्षात १.५० लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.
बँकेतील ठेवींवर मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर व्याज घेऊ शकता. ‘टॅक्स सेव्हिंग एफडी’वर सर्वाधिक व्याज देणार्या पाच बँकांबद्दल जाणून घेवूया…
१. युनियन बँक ऑफ इंडिया
- युनियन बँकेने एफडी व्याजदरात वाढ केली आहे.
- २५ नोव्हेंबर रोजी लागू होणाऱ्या व्याजदरांनुसार, पाच वर्षांच्या कर बचत एफडीवर बँकेकडून ६.७० टक्के व्याज दिले जात आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून ०.५० टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
२. कॅनरा बँक
- कॅनरा बँक पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर ६.५० टक्के व्याज देत आहे.
- एफडी घेणारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्यास, त्याला बँकेकडून ७.०० टक्के व्याज दिले जात आहे.
३. इंडियन ओव्हरसीज बँक
- पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर बँक ६.४० टक्के व्याज देत आहे.
- या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के व्याज दिले जात आहे.
४. इंडियन बँक
- इंडियन बँकेने अलीकडेच एफडी व्याजदरात वाढ केली आहे.
- सध्याच्या व्याजदरानुसार पाच वर्षांच्या करबचत एफडीवर ६.४० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के व्याज दिले जात आहे.
५. बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया बँकेने या महिन्यातच नवीन व्याजदर लागू केले आहेत.
- पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर बँक ६.२५ टक्के व्याज देत आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५० टक्के व्याज दिले जात आहे.
टॅक्स सेव्हिंग एफडी कशी काम करते?
- ही बँका आणि NBFCs द्वारे ऑफर केलेली आर्थिक तरतूद आहे.
- एका निश्चित कालावधीसाठी किंवा कार्यकाळासाठी एकरकमी पैसे जमा करा.
- टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिटचा कालावधी ५ वर्षांचा असतो.
- हे आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलत देते.
- यात लॉक-इन कालावधी आहे.
- मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नाही.
- ठेवींवर मिळणारे व्याज करपात्र असते.
- टॅक्स सेव्हिंग एफडीच्या मॅच्युरिटीच्या वेळी, मॅच्युरिटीची रक्कम एफडीशी संबंधित बचत खात्यात जमा केली जाते.