मुक्तपीठ टीम
लोक जगभरातील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी गुगलचा वापर करतात त्यामुळे आपण जे काही शोधतो त्याची माहिती अगदी थोड्या सेकंदात गुगलवर मिळते. या वर्षी भारतातील लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले आहे. या यादीत समाविष्ट असलेली नावे जाणून आश्चर्य वाटेल. चला या यादीवर एक नजर टाकूया.
१) नुपूर शर्मा:
- गुगलच्या टॉप सर्चमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली नुपूर शर्मा.
- नुपूर शर्मा तिच्या एका वक्तव्यामुळे ती पूर्वी खूप चर्चेत होती.
- तिच्या त्या वक्तव्याचा शोध घेण्यासाठी लोकांनी नुपूर शर्मा सर्वात जास्त सर्च केले.
२) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू:
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या आहेत.
- द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत.
- राष्ट्रपती झाल्यानंतर लोक व्यासपीठावर त्यांच्या जीवनाशी संबंधित गोष्टी शोधू लागले.
३) ऋषी सुनक:
- ऋषी सुनक गुगलच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- युनायटेड किंगडमचे पंतप्रधान होणारे ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत.
- भारतीयांना त्यांच्या पंतप्रधान झाल्याचा खूप अभिमान वाटला आणि गुगलवर त्यांच्याबद्दल प्रचंड शोध घेतला.
४) सुष्मिता सेन:
- सुष्मिता सेन चौथ्या क्रमांकावर आहे.
- सुष्मिता सेनही तिच्या आणि ललित मोदी यांच्या नात्याच्या बातम्यांबाबत गुगल टॉप सर्चवर आहे.
५) ललित मोदी:
- ललित मोदी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.
- ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्यासाठी या वर्षी त्यांना खूप सर्च करण्यात आले.