Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रॅगिंग म्हणजे नेमकी कशी अमानुषता? समजून घ्या कायदा आणि कशी करावी तक्रार…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ragging (1)

मुक्तपीठ टीम

नवी मुंबईतील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंगसंबंधित धक्कादायक घटना घडली आहे. चार सिनियर वर्गातील विद्यार्थ्यांनी एका ज्युनिअर वर्गातील विद्यार्थ्याला दारू पाजली आणि त्याला पॅंटमध्येच लघवी करायला भाग पाडले. नवी मुंबईतील या घटनेमुळे पुन्हा एकदा रॅगिंग सारखा गंभीर मु्द्दा चर्चेत आला आहे. रॅगिंगविरुद्ध सर्वोच्च न्यायालय, विद्यापीठ अनुदान आयोगाने यापुर्वी अनेक वेळा निर्देश दिलेत. महाराष्ट्र शासनाने कायदा केला आहे. प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंगविरुद्ध समिती असूनही रॅगिंगच्या घटना उघडकीस येतात. त्यामुळे समजून घ्या कायदा काय सांगतो आणि कशी करावी तक्रार…

रॅगिंग म्हणजे काय?

  • एखाद्या विद्यार्थ्याकडून किंवा ग्रुपकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांना इतरांसमोर अपमानास्पद वागणूक देणे.
  • छळ करणे.
  • एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मनाविरुद्ध कृत्य करण्यास भाग पाडणे.
  • त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण करणे.
  • कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवणे.
  • सुरुवातीला रॅगिंग (ragging)हा प्रकार छोट्या गोष्टींनी सुरू झाला होता. त्यात ओळख करुन देण्याचा उद्देश होता. त्यानंतर त्याचे स्वरुप गंभीर होऊ लागले.
  • सगळ्यांसमोर नाचायला, गायला लावणे, कोणालाही शिव्या द्यायला लावणे, मुला-मुलीला प्रपोज करणे, छेड काढणे, शिक्षकांची टिंगल किंवा खोड्या करायला सांगणे, काही तरी खाण्या-पिण्यास सांगणे / अमली पदार्थाचं सेवन करण्यास सांगणे, अश्लील दृक्श्राव्य फिती पाहावयास सांगणे, अश्लील कृतीत सहभाग घ्यावयास सांगणे, शारीरिक इजा पोहोचवणे असे प्रकार सुरु झाले.

ragging (2)

रॅगिंगविरोधात कायदा-

न्यायालयाच्या आदेशानुसार यूजीसीने रॅगिंग (ragging)प्रतिबंधक कायदा आणि नियमावली तयार केली आहे.

  1. रॅगिंगविरोधी पथक करावे.
  2. महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंगविरोधी विभाग/समिती नेमावी.
  3. सीसीटीव्ही कार्यान्वित करावे.
  4. विद्यापीठांनी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
  5. विद्यार्थ्यांशी नियमित सुसंवाद, मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत.
  6. माहितीपत्रकात रॅगिंगविरोधी सूचना द्याव्यात.
  7. वसतिगृहे, कँटीनमध्ये भेट द्यावी.

रॅगिंग केल्यास शिक्षा कोणती?

  • जी कोणी व्यक्ती शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या बाहेर एखाद्या विद्यार्थ्याला रॅगिंग करत असेल, ती व्यक्ती तसेच त्या व्यक्तीला साथ देणारे आणि रॅगिंगचा प्रचार करणारे सर्व विद्यार्थी यामध्ये दोषी धरले जाऊ शकतात.
  • यासंदर्भात अपराध सिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंतच्या कारावासची शिक्षा होऊ शकते.
  • तसेच दहा हजार रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

इथे करावी तक्रार-

  • १८००-१८०-५५२२ या टोल फ्री क्रमांकावर २४ तास तक्रार करता येऊ शकते.
  • helpline@antiragging.in यावर मेल करुन तक्रार दाखल करता येऊ शकते.

हे ही वाचा:

नवी मुंबईच्या डेंटल कॉलेजमध्ये सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियरला ट्राऊझरमध्येच लघवी करायला भाग पाडले! महाराष्ट्रात नवं नाही रॅगिंग…


Tags: Lawnavi mumbairaggingकायदानवी मुंबईरॅगिंग
Previous Post

पोलीस ठाण्यात गोळीबार, महिला महापौरांच्या घरावर सुतळी बॉम्बहल्ला, अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की, वाद! शिंदे गटामुळे भाजपात अस्वस्थता!

Next Post

सामान्यांचा मंत्रालय फेरा टाळा! ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज गतिमान करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Next Post
eknath shinde

सामान्यांचा मंत्रालय फेरा टाळा! ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज गतिमान करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!