मुक्तपीठ टीम
बिहारमधील बहुचर्चित जात-आधारित जनगणना, ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही सराव दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व घरकुलांची मोजणी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात, मार्चपासून, प्रगणक सर्व जाती आणि पोटजाती आणि धर्मातील लोकांशी संबंधित डेटा गोळा करणार. त्या सर्व लोकांच्या आर्थिक स्थितीची माहिती देखील रेकॉर्ड केली जाणार. जातीच्या आधारावर, बिहार सरकार बिहारची लोकसंख्या आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन धोरणे तयार करणार आहे. आता ही जात-आधारित जनगणना नेमकी कशी असणार? चाला जाणून घेवूया…
कशी असणार जात जनगणना? कोणते प्रशन विचारले जाणार?
- लोकांना त्यांच्या जात प्रमाणपत्राची कॉपी जोडावी लागेल.
- जात प्रमाणपत्र क्रमांकही नमूद करावा लागेल.
- सर्व जिल्ह्यांना जात जनगणनेसाठी २६ प्रश्नांचा प्रोफॉर्मा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- जात जनगणना पथकातील सदस्यांचे प्रशिक्षण १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
- जातीनिहाय जनगणना पूर्णपणे आमलात आणण्यासाठी एक अॅप देखील बनवले जाईल.
- बेल्ट्रॉनकडे यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.
- जात गणनेसाठी जात प्रमाणपत्राचा क्रमांक ठेवावा लागेल.
- ज्यांच्याकडे जातीचा दाखला नाही त्यांच्या शेजाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल
- जात जनगणनेत सरकार लोकांकडून २६ प्रश्न विचारणार आहे
- ७ जानेवारीपासून जात गणनेला सुरुवात होणार आहे.
डेटा शीट जवळजवळ तयार…
- सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव बी. राजेंद्र यांनी सांगितले की, जात जनगणनेचे डेटाशीट जवळपास तयार झाले आहे.
- लोकांचे उत्पन्न, राहणीमान आणि शैक्षणिक पात्रता याबाबतही प्रश्न विचारले जातील.
- राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाला जात जनगणनेसाठी नोडल विभाग बनवले आहे.
- बिहारमधील जात जनगणनेबाबत १ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला होता.
- बैठकीत बिहारमधील सर्व धर्माच्या जाती आणि पोटजातींची जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.