मुक्तपीठ टीम
भारतात अनेक प्रकारच्या विमा आणि कर्ज कंपन्या आहेत. त्या बर्याचदा ई-मेल पाठवून, मेसेज पाठवून आणि कॉल करून त्यांच्या नवीनतम योजना आणि ऑफरबद्दल माहिती देत असतात. पॉलिसीबझार ही अशीच एक कंपनी आहे. अशा मेल्स आणि कॉल्सचा त्रास होत असेल, तर पॉलिसी बाजारने त्यांच्या वेबसाइटवर ते टाळण्याचा मार्गही दिला आहे. तो मार्ग काय आहे बघूया…
पॉलिसी बाझार आहे तरी काय?
- आलोक बन्सल यांनी २००८ मध्ये पॉलिसीबझारची सुरुवात केली होती.
- ही एक विमा तंत्रज्ञान कंपनी आहे जी विमा कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या विमा आणि आर्थिक उत्पादनांची तुलना करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रदान करते.
- पॉलिसी बाझार हे भारतातील सर्व विमा उत्पादनांसाठी सर्वात मोठे एग्रीगेटर आणि बाजारपेठ आहे.
- पॉलिसी बाझार ग्राहकांना विविध विमा पॉलिसींचे संशोधन आणि तुलना करण्यात मदत करते.
- मार्केटिंग कॉल्स आणि ई-मेल्समुळे हैराण असाल, तर कंपनीने त्यांच्या वेबसाइटवरच या समस्येचे निराकरण केले आहे.
- चला जाणून घेऊया या सोप्या स्टेप्स.
पॉलिसी बाझारचे सदस्य नसल्यास हे करा आणि मेल आणि कॉल वगळा त्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करा…
- सर्वप्रथम डेस्कटॉप/मोबाइल फोनवर PolicyBazaar.com/unsubscribe पेज उघडा.
- येथे OTP आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
- OTP प्रविष्ट केल्यानंतर, थेट एका पृष्ठावर नेले जाईल जिथे काही वैयक्तिक तपशील जसे की नाव, जन्मतारीख आणि ई-मेल प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
- हे सर्व तपशील भरा
- आता पॉलिसी बाझारसाठी पासवर्ड सेट करण्यास सांगितले जाईल.
- पासवर्ड सेट केल्यावर, पॉलिसी बाझार खाते स्क्रीनवर उघडेल.
- प्रोफाइल टाकून सेटिंग पर्याय शोधा
- सेटिंग वर क्लिक केल्यावर, स्क्रीनवर कम्युनिकेशन प्राधान्यांचे पृष्ठ उघडेल.
- येथे एसएमएस, कॉल आणि व्हॉट्सअॅपचा पर्याय दिसेल
- या पर्यायांमधून ज्या माध्यमाद्वारे संप्रेषण चालू ठेवायचे आहे ते निवडा आणि ज्या बॉक्समधून संवाद ठेवायचा नाही त्या बॉक्समधून टिक काढून टाका.
- एकाच वेळी सर्व संप्रेषण प्राधान्यांमधून सदस्यत्व रद्द करू शकता.
- यासाठी Unsubscribe From All पर्यायावर क्लिक करू शकता.